भगवान परशुराम जन्मोत्सव, रमजान ईद आणि महात्मा बसवेश्र्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा

नांदेड(प्रतिनिधी)-आज वैशाख मासाची तृतीया यालाच अक्षय तृतिया पर्व म्हटले जाते. आज भगवान परशुरामजी यांचा जन्मोत्सव आहे, महात्मा बसवेश्र्वजी यांचा जन्मोत्सव आहे. तसेच लक्ष्मी योग सुध्दा याच दिवशी असतो यंदाची अक्षय तृतीया मंगळवारी आली आहे. रोहिणी नक्षत्राचा संयोग या दिवशी शुभ मानला गेला. आज मुस्लिम बांधवांचा रमजान हा ईद हा सण पण आहे. नांदेड शहरात आणि जिल्ह्यात भगवान श्री. परशुराम जन्मोत्सव, महात्मा बसवेश्र्वरजी जन्मोत्सव आणि रमजान ईद अत्यंत उत्साहात साजरी झाली.
आज सकाळी 8 वाजता देगलूर नाका येथील ईदगाह मैदानावर लाखोंच्या संख्येने मुस्लीम बंधु जमले आणि रमजान ईदची सामुहिक नमाज साजरी झाली. शहरात अनेक ठिकाणी भगवान श्री. परशुराम जन्मोत्सव साजरा झाला. सोबतच महात्मा बसवेश्र्वर यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. काबरानगर जवळी परशुराम चौकात अनेकांनी भगवान श्री परशुरामजींना अभिवादन केले. तसेच महात्मा बसवेश्र्वरजी यांच्या स्मारकाला भेट देवून अनेकांनी अभिवादन केले. मुस्लिम समाजाने एक दुसऱ्याला भेट देवून ईदच्या शुभकामना दिल्या. अशा प्रकारे अत्यंत उत्साहात आणि आनंदात हे तिन्ही सण साजरे झाले.

श्री भगवान परशुराम जन्मोत्सवा निमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने कलावंत शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन व भगवान परशुराम चौक काबरा नगर येथे भगवान परशुरामांचा प्रतिमेला व नामफरकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, सिनेअभिनेते शरद पोंक्षे, आमदार बालाजी कल्याणकर, सयोजक ब्राह्मण महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष निखिल लातूरकर, मनपा महिला बालकल्याण सभापती सौ.अपर्णा नेरलकर, भाजपा जिल्हाध्यक्ष महानगर प्रविण साले, रोहित पाटील, महेश बाळू खोमणे, मिलिंद देशमुख, सुनील रामदासी, मंडळ अध्यक्ष आशिष नेरलकर, ब्राह्मण महासंघ जिल्हाध्यक्ष विजय जोशी, अनिल डोईफोडे, संतोष परळीकर, कृष्णगुरू परळीकर, लक्ष्मीकांत पांडे, संतोष कुलकर्णी, मुकुंद मुळे, नाथा चितळे, दीपक कासराळीकर, प्रा. रमाकांत जोशी, प्रा. बालाजी गिरगावकर, शशिकांत पाटील, सौ.मनीषा कुन्शावलीकर, सौ. प्रीती वडवळकर, सौ.भाग्यश्री कुलकर्णी, सौ.अपर्णा मोकाटे, सौ.अर्चना शर्मा, सौ.जयश्री बंगाळे, सौ.अपर्णा चितळे, पुरोहित वर्ग, यांच्यासमवेत ब्राह्मण वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगद्ज्योती महात्मा बसवेश्‍वर यांच्या जयंती निमित्त शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवा संघटनेच्यावतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीला उदंड प्रतिसाद मिळाला. या मिरवणुकीत मोठया प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेल्या या मिरवणुकीची सांगता महात्मा बसवेश्‍वर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आली.
सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ.अमरनाथ राजूरकर, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांच्या हस्ते  मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. यावेळी महात्मा बसवेश्‍वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष पांडागळे, स्वागत अध्यक्ष संजय बेळगे, कार्याध्यक्ष वैजनाथ तोनसुरे, शिवाचे जिल्हा संपर्क प्रमुख अनिल महाळगे, मराठवाडा अध्यक्ष संजय कोठाळे, राज्य सरचिटणीस विठ्ठल ताकबिडे, दिगंबर मांजरमकर, बालाजी इबितदार यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना हार घालून ही मिरवणूक वजिराबाद मार्गे जुन्या मोंढ्यातून  महात्मा बसवेश्‍वर पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये  नांदेड उत्तरचे आ. बालाजीराव कल्याणकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख बबनराव बारसे,शिवाचे जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील बुड्डे, बालाजी बंडे, शंकर पत्रे, जी.एस.मंगनाळे, शिवाजी कहाळेकर, विजय हिंगमिरे, बाबुराव कैलासे, संभाजी पावडे, शिवराज उमाटे,श्रीकांत आरसेवाड, संग्राम काडवदे, सिध्देश्‍वर स्वामी, निळकंठ चोंडे,चंद्रशेखर शिराळे, डॉ.शंकर धमनसुरे, महावीर शिवपुजे, डॉ.संतोष स्वामी,वीरभद्र बसापुरे, नंदाताई पाटील,नंदूअप्पा देवणे यांच्यासह शिवा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *