“राज,देवेंद्र तुम्हाला धोंडू बाई,खमरू बी सारखी लेकरं बाळ आहेत का?”

मुबंई- सत्ता हस्तगत करून हिंदुराष्ट्र आणण्यासाठी,देवेंद्र च्या चिथावणीतून राज ठाकरे,राणा व इतर दंगली घडविण्याच्या मोहिमेवर आहेत .प्रत्येक दंगलीत काय घडते?1984 भिवंडी दंगलीत काय दिसलं?

धोंडू बाई मुंजारे जात हरिजन ,धंदा शेतमजूर …राहणार बेनाड ,जिल्हा बेळगाव  दोन मुलं मारिती हा  भिवंडीत यंत्र माग कामगार होता. दुसरा भीमा  मुंबईत हमाली व सफाई  कामगार होता. भीमा हा लग्न पत्रिका देण्यासाठी व भावाला भेटण्यासाठी सह कुटुंब भिवंडी ला गेला.लग्नाच्या शेवटच्या क्षणापर्यंत धोंडूबाई लेकरांची व नातवांची वाट पहात होती.भिवंडीत दंगल चालू असल्याने ते अडकले असावेत.कर्फ्यु शिथिल झाल्यावर धोंडूबाई भिवंडीतील आझमीनगर येथे गेली.  झोपडपट्टीच्या जागी राखेचे ढीग दिसत होते!

त्याच अस झालं होतं.17 मे 1984 ला भिवंडीत झाडावरील हिरवा झेंडा काढून त्याजागी भगवा झेंडा लावला यावरून दंगल पेटली होती.”नारे तकदिर अल्ला ओ अकबर” घोषणा देणाऱ्या जमावाने भीमा व मारुती वर हल्ला केला मारू नका मारू नका म्हणणाऱ्या त्यांच्या बायकांना झोडपले.त्यांची मुलगी गीता वय 5 वर्ष व मुलगा संदीप  वय 2 वर्ष  .मारू नका मारू नका म्हणून त्यांच्या अंगावर पडल्यावर जमावाने  मशालीचे चटके दिले.पोलिसांनी अर्धवट जळालेल्या चार प्रेतांचा पंचनामा केला पण दोन मुलं सापडली नव्हती.धोंडूबाईन जळालेल्या प्रेतांचा चेहरे  ओळखले पण नातवंड सापडलीच नाहीत.

त्याच दिवशी अन्सार बागेत खमरुबी सारखे शेकडो झोपडपट्टी वासी आश्रयाला जमले.मोठा जमाव चाल करून गेला.”हरहर महादेव जय भवानी जय शिवाजी” घोषणा देणारे छोटे मोठे जमाव चढाई करीत होते. खमरुबीचा एक मुलगा जायबंदी झाला.दुसऱ्यावर तलवार उगारली गेली.तशी खमरुबी बोलली” उसको मत मारो।अल्ला कसम ओ मेरा अकेला कमाने वाला बेटा है! मत मारो…..पण ऐकतो कोण?सगळीकडे धूर,ज्वाळा,बोंबील भाजल्याचा वास,आक्रोश,… !   अन्सारी बागेतील पंचनाम्यासाठी प्रेते मोजणे सुरू केले.एक दोन,तीन,..वीस,…..तीस.चार दिवसांनंतर विहिरीत फुगून आलेले दोन मुडदे मिळून बत्तीस झाले.

धोंडूबाईच्या नातवांचा  शोध सुरू झाला.दुसऱ्या दिवशी रात्री  रात्र गस्तीत नात गीता गावा बाहेरच्या निर्जन जागी झुडपा आड पहुडलेली दिसली.तिसऱ्या दिवशी एक मुस्लिम महिलेला त्या निर्जन जागी झुडुपा आड एक मूल रडताना दिसलं.तीन ते उचलले.आपला मुलगा म्हणून सांभाळले.शेजाऱ्यांनी दिलेल्या गुप्त माहिती वरून पोलीसांनी तीन महिन्यांनंतर धोंडुबाईंच्या हवाली केला.

मी भिवंडीला गेल्यावर धोंडूबाई,गीता खमरुबी,……. अश्या सर्व पीडितांशी बोललो.धोंडूबाईने सांगितले”हे माझं कर्म(म्हणजे पूर्व जन्मातील पापाचे फळ)होत. .खमरुबी बोलली”ये तो अल्ला की मर्जी थी!”

भिवंडी दंगलीनन्तर चिथावणीखोर नेते सत्तेत आले.सर्व भोग भोगू लागले.

आजही देवेंद्र,राज दंगली घडवून सिंहासनावर आरूढ होण्यासाठी हापापलेले आहेत.त्यांना सत्ता मिळविण्यासाठी असंख्य धोंडूबाई, खमरुबी यांच्या लेकराकडे पहावे मला दोन मुले असल्याने पुढे मी देशातील दंगली समूळ नष्ट करण्याचा जागतीक पातळीवर नावाजलेला भिवंडी  प्रयोग, मोहल्ला कमिटी हा प्रयोग  राबविला होता .त्यामुळे अयोध्या घटनेनंतर मुंबई दोनदा जाळली पण भिवंडी शांत राहिली शेकडो लोकांचे प्राण वाचले.

देवेंद्र,राज,राणा…,…, तुमच्या लेकरांच्यावर अशी पाळी आली तर तुम्हाला काय वाटेल? तुम्हाला तुमची लेकरं महत्वाची की सत्ता?

उत्तर द्यावे लागेल.

सुरेश खोपडे.

सेवा निवृत भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *