नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचा खून आणि दोन गंभीर जखमी; एक खून अजून वाढला

नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाचा खून आणि त्यांचे दोन बंधू गंभीर झाल्याचा प्रकार आज दि. ४ मे रोजी दुपारी ४.३० वाजता घडला आहे. या प्रकरणाची कायदेशीर कारवाई अद्याप पूर्ण झालेली नाही. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब आहेत.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नवीन नांदेड भागात बळीरामपूर या भागात असलेल्या सुनीलनगर, बकीट कारखान्याजवळ दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास शेख फारूख शेख अमीन साब आणि त्यांच्या कुटूंबियांवर मारेकरी अब्दुल सत्तार, अब्दुल मुख्तार, सोहेल व इतरांनी हल्ला केला. हल्ल्याचे कारण जुन्या वादाच्या प्रकारातून होते. या हल्ल्यात वापरलेल्या धारदार शस्त्राच्या अनेक घावांनी शेख फारूख शेख अमीन साब यांचा मृत्यू झाला आहे. सोबतच त्यांचे दोन बंधू शेख रमजान आणि शेख युनूस हे गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर रूग्णांवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे माहिती घेतली असता अद्यापपर्यंत आम्हाला काही एक माहिती नाही, असे सांगण्यात आले. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मागील एक वर्षापेक्षा जास्त कार्यकाळापासून तोंडी आदेशावर तेथे कार्यरत आहेत. काही माजी मंत्र्यांच्या आधारे त्यांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती हवी आहे, असे सांगण्यात आले. काही दिवसांपुर्वी एका दारू विक्रेत्यावर त्यांनी गोळीबार करून एका अत्यंत दणकट पोलीस अंमलदारांचा जीव वाचवला होता म्हणे. त्यासाठी अनेक जागी सत्कार झाला तेव्हा पोलिसांना हार कमी आणि शिव्या जास्त मिळतात असे वक्तव्य त्यांनी भाषणात केले होते. झालेला खून प्रकार आणि दोन युवकांना गंभीर जखमी करणे हल्लेखोरांनी कोणत्या दमावर केले हे शोधण्याची गरज आहे. गुन्हेगारांचे कर्दनकाळ, गोळीबारात विशेष प्राविण्य प्राप्त असणारे पोलीस निरीक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या हद्दीत झालेला हा खून प्रकार नक्कीच विचार करण्यासारखा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *