नांदेड(प्रतिनिधी)-सध्या राष्ट्रीय महामार्गांचे नवीन काम अत्यंत जोमात सुरू आहे. पण त्यासाठी लागणारे नियोजन नसल्यामुळे अनेक अपघात घडले आहेत. असाच एक अपघात आज जानापूरी-विष्णुपूरी रस्त्यावर घडला. कर्नाटक राज्यातील एक बस आणि नांदेड जिल्ह्यातील एक मालवाहू टेम्पो यांच्यात झालेल्या अपघाताने दोन जणांना आपला जीव गमवावा लागला.
नांदेडकडून कर्नाटकडे जाणारी बस क्रमांक के.ए.38 एफ.1021 ही नांदेडकडे येणाऱ्या एका मालवाहू टेम्पो क्रमांक एम. एच.26ए.डी.8115ला धडकली. धडक ऐवढी जोरदार होती. की, मालवाहू टेम्पोमधील राम लक्ष्मण चिंतलवार (38) आणि धोंडीबा लक्ष्मण केंद्रे (55) या दोघांचा जीव गेला. घटनेची माहिती मिळताच सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल भोसले आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले. जखमींना त्वरीत रुगणालयात नेण्यात आले. कर्नाटक राज्यातील बस चालक स्वत: पोलीस ठाणे सोनखेड येथे हजर झाला.
देशात राष्ट्रीय महामार्गांचे काम अत्यंत मोठ्या प्रमा.णात सुरु आहे. पण या कामांसाठी घ्यावी लागणारी दक्षता आणि त्यासाठी आवश्यक असलेले दिशादर्शक फलक आणि रेडियम पट्या आदी नसल्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. कांही दिवसांपुर्वीच याच सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशभर फिरलेला एक दुचाकी स्वार रेडीयम पट्या न लावल्यामुळे आणि दिशादर्शक नसल्यामुळे खड्यात पडला होता. अब्जो रुपयांची बिले कंत्राटदारांना या कामासाठी दिली जात आहेत. त्यातील कांही रुपये हे दिशादर्शक बोर्ड लावणे, वाहनांना योग्य मार्गदर्शक फलक लावणे, यासाठी खर्च केले तर नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात होणारे असंख्य अपघात वाचतील. पण हा सिस्टीमचा भाग आहे आमच्रूा शब्दांनीच सिस्टीम दुरूस्त होणार असती तर भारताच्या स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत असंख्य लेखण्या झिजल्या असतील पण शासनावर प्रभाव पडेल तरच. आम्ही वाहन चालकांना एक विनंती नक्की करू इच्छीतो की, आपला जीव अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यासाठी कोणतीही रिस्क घेवू नका. आपला प्रवास एखादा तास उशीराने पुर्ण होईल. पण जीव सुरक्षीत राहिल याची दक्षता नक्की घ्या.
विष्णुपूरी-जानापूरी रस्त्यावर बस-टेम्पोचा अपघात; दोघांचा मृत्यू