
नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड व तायक्वांदो, धनुर्वीद्या, व डान्स संघटनेच्या वतिने दि. १० मे, ते २५ मे, 2022 दरम्यान उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असून अशोक नगर येथे सकाळी ८ ते १० च्या दरम्यान हे शिबीर होणार आहेत. यामध्ये सेल्फ डिफेंस, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासंबधी मार्गदर्शन, खेळाडूच्या आहाराविषयक समस्या व समाधान, खेळातून होणाऱ्या दुखः पती व त्यावरील उपाय, करीअरमध्ये खेळाचे स्थान यावर विविध मान्यवरांचे व्याख्यान घेण्यात येणार असून औलम्पिक मध्ये असलेल्या • तायक्वांदो मार्शल आर्ट व धनुर्वीघा या खेळातील विविध कौशल्य शिकविण्यात येणार आहेत.
सदरील शिबीरात सहभागी सर्व खेळाडूना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतिने प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार असून पुढील शैक्षणीक वर्षात होणाऱ्या स्पर्धामध्ये उत्तम कामगीरी करण्यायोग तयारी करूण घेण्यात येणार आहे. सदरील शिबीर शहरात विविध भागात होणार आहे. यामध्ये 1) अशोक नगर मास्टर बालाजी जोगदंड, 2) राम नगर हनुमान गड अतुल गोडबोले, सिडको रुसीकेश टाक, 3) चैतन्य नगर. विनोद दाडे हे तायक्वांदो प्रशिक्षण देणार असुन – • डान्स साठी गौरव उदगीरकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. शहरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या शिबीरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करून मोठया प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, क्रीडा अधिकारी गुरदीपसिंघ संधू, किशोर पाठक, प्रविण कोंडेकर, क्रीडा मार्गदर्शक शिवकांता देशमुख, अनिल बंदेल, नांदेड ऑलम्पीक असोसियनचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते रमेश पारे, ऑलम्पिक संघटना सचिव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मास्टर बालाजी पाटील जोगदंड, धनुर्विद्या संघटना सचिव वृषाली पाटील जोगदंड, डॉ. हंसराज वैध, सहसचिव संजय चव्हाण, यांनी केले आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी कळविले आहे.