विनोद रापतवार आणि विजय होकर्णे वाद आता समाप्त;वजिराबाद पोलिसांना चौकशी बंद करावी लागणार

वरिष्ठ कार्यालयाच्या कार्यवाहीचे काय ?

नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्हा माहिती अधिकारी आणि त्यांच्या विभागात काम करणाऱ्या छायाचित्रकार यांच्यात झालेल्या वादावर आता पडदा पडला. होकर्णे बंधूने दिलेला अर्ज आता परत घेतल्याने पोलिसांचे काम समाप्त झाले हे मात्र नक्की.

दिनांक १३ मार्च २०२२ रोजी एका शासकीय कार्यक्रमात त्या कार्यक्रमाचे वृत्त घेणे आणि छायाचित्र घेण्याची जबाबदारी जिल्हा माहिती कार्यालयाची होती.त्यानुसार जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार,जिल्हा माहिती कार्यालयाचे छायाचित्रकार विजय होकर्णे आणि कार्यालयातील इतर मंडळी त्या कार्यक्रमात काम करत असतांना विनोद रापतवार आणि विजय होकर्णे यांच्यात वादावादी झाली.वादावादी बरीच मोठी झाली आणि विजय होकर्णे यांचा बीपी (रक्तदाब) शूट झाला.त्यावेळी त्या कार्यक्रमात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीळकंठ भोसीकर उपस्थित होते.त्यांनी लगेच तपासणी करून विजय होकर्णे यांची रवानगी नारायणा हॉस्पिटल कडे केली.

त्यावेळी विजय होकर्णेचे बंधू भारत होकर्णे यांनी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्या मुळेच भाऊ विजय होकर्णेची तबियत बिघडली या शब्दांसह भरपूर काही लिहिलेला अर्ज वजिराबाद पोलीस ठाण्यात दिला.त्याच दिवशी १३ मार्च रोजी विनोद रापतवार यांनी आपल्या वरिष्ठ कार्यालयांना सविस्तर अहवाल पाठवला.नंतर वजिराबाद पोलिसांनी विनोद रापतवार यांना बोलावले तेव्हा अत्यंत मोठा सविस्तर इतिहास लिहून विनोद रापतवार यांनी आपल्या विरुद्ध आलेल्या भारत होकर्णेच्या अर्जावर उत्तर दिले.विनोद रापतवार यांनी आपल्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेल्या अहवालावर काय कार्यवाही झाली हे आजही समजलेले नाही. वजिराबाद पोलीस ठाण्यात सुद्धा या अर्जाचीच चौकशी सुरु होती.कोणताही गुन्हा इत्यादी दाखल झालेला नव्हता. आलेल्या अर्जाची चौकशी करणे हि जबाबदारी पोलीस पार पाडत होते.

चौकशी दरम्यान दिनांक १८ एप्रिल रोजी भारत होकर्णे यांनी विनोद रापतवार विरुद्ध दिलेला अर्ज आपण परत घेत असल्याचे पत्र वजिराबाद पोलिसांना दिले.याबाबत पूर्वीच अशी चर्चा सुरु होती की,वाद विनोद रापतवार आणि विजय होकर्णे यांच्यात झाला असतांना भारत होकर्णेचा अर्ज चालतो काय ? असो. म्हणूनच म्हणतात ना की,पोलीस खाते करील तेच होईल. अश्या प्रकारे अर्ज परत घेतल्याची लेखी सूचना पोलिसांना प्राप्त झाली. पण पोलिसांना समाधान झाले तरच हि चौकशी बंद होणार होती.म्हणून पोलिसांनी विजय होकर्णे यांना पाचारण केले.तेव्हा त्यांनी २७एप्रिल २०२२ रोजी लेखी स्वरूपात वजिराबाद पोलिसांना माहिती दिली की,माझा भाऊ भारत होकर्णे याने मला कोणतीही कल्पना न देता मजे अधिकारी विनोद रापतवार विरुद्ध अर्ज दिला होता.लहान भावाने दिलेल्या तक्रारी बद्दल मला काही एक कल्पना सुद्धा नव्हती.आता त्याने तक्रार परत घेतल्याचे मला कळले आहे.संपूर्ण प्रकरणात सद्य स्थितीत माझे काहीही म्हणणे नाही.आता मात्र वजिराबाद पोलीस या चौकशीला नक्कीच बंद करतील असे लिहिले तर चुकीचे ठरणार नाही.

संबंधित बातमी..

https://vastavnewslive.com/2022/03/14/जिल्हा-माहिती-अधिकारी-आण/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *