नांदेड(प्रतिनिधी) -पहाटे 4.30 वाजता गडचिरोली जिल्ह्यातील निलेश दुर्गेला मारहाण करून लुटणाऱ्या दोन जणांना भाग्यनगर पोलीसांनी कांही तासातच शोधून काढले आणि त्यांना अटक केली आहे. या दरोडेखोरांमध्ये एक शिक्षक पुत्र आहेत आणि एक गडगंज श्रीमंत माणसाचा पुत्र आहे. त्याची आज शल्यचिकित्सा होणार होती. दरोड्याचे कारण उगीचच आहे.
आज पहाटे 4.30 वाजता भाग्यनगर रस्त्यावरून बसस्थानकाकडे जाण्यासाठी थांबलेल्या गडचिरोली जिल्हयातील युवक निलेश दुर्गेला तुला तुझ्या ईच्छीत स्थळी 100 रुपयात सोडतो असे सांगून त्यास गाडीवर बसवले आणि कैलासनगर भागात नेऊन त्याला मारहाण करून 1700 रुपये रोख रक्कम आणि मोबाईल लुटला. जिगरबाज निलेश दुर्गेने मारहाण करणाऱ्यांमधील एकाला पकडले आणि दुसरा पळून गेला होता. जनतेने मदत करून पकडलेला दरोडेखोर पोलीसांच्या स्वाधीन केला.
याप्रकरणात पोलीस उशीरा घटनास्थळी आले अशी ओरड अनेक सामाजिक संकेतस्थळांवर झाली. तशा वृत्तांना सुध्दा प्रसिध्दी देण्यात आली. याबाबत आम्ही सविस्तर वृत्त लिहिलेले आहे. भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या लुट प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेतले आणि पळून गेलेला दुसरा दरोडेखोर ताब्यात घेतला. यात एकाचे नाव सुमित एडके (18) असे आहे. विशेष म्हणजे सुमित एडकेचे वडील हे शिक्षक(गुरूजी) आहेत. दुसरा दिपक नारवाड (19) हा आहे. या युवकाची भाग्यनगर रस्त्यावर मोठी इमारत आहे. अर्थात तो गडगंज संपत्तीचा मालक आहे. या चोरट्यांना पकडल्यानंतर तुम्ही असे का केले याची विचारणा झाली तेंव्हा आम्ही असे उगीचच केले असे उत्तर दरोडेखोर देतात. पोलीसांवर टिका करतांना या युवकांचा गुरु कोण याचा शोध सुध्दा पोलीसांवर टिका करणाऱ्यांनी घेतला पाहिजे आणि सामाजिक संकेतस्थळांवर पोलीसांविरुध्द टिका करण्यापेक्षा अशा लहान वयाच्या बालकांमध्ये आपल्याला सुधारणा कशी करता येईल यावर विचार करण्याची गरज आहे.
सुमित एडके आणि दिपक नारवाडचे आई-वडील पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांनी निलेश दुर्गेला ज्याचे डोके या दोन दरोडेखोरांनी फोडले होते. त्याला बऱ्याच विनंत्या केल्या तेंव्हा निलेश दुर्गे सुध्दा तयार झाला होता. माझा मोबाईल आणि पैसे द्या मला गुन्हा दाखल करायचा नाही. पण सकाळी 7 वाजल्यापासून विविध संकेतस्थळांवर पोलीसांना ट्रोल केले जात होते. मग नवीन भानगड पोलीस कशाला घेतील. त्यानुसार सुमित एडके आणि दिपक नारवाड या दोघांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास भाग्यनगरच्या सहाय्यक पोलीस निरिक्षक भारती वाठोरे यांच्याकडे देण्यात आला आहे. सकाळपासून पोलीसांना ट्रोल करणाऱ्यांनी आता या पकडलेल्या दरोडेखोरांसोबत चांगला व्यवहार करा असे पोलीसांना सांगू नये म्हणजे कमावले.
संबधित बातमी
https://vastavnewslive.com/2022/05/08/पोलीस-रात्रीची-ड्युटी-कर/