नांदेड,(प्रतिनिधी)- एका अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकसह दोन जणांना सिंदखेड पोलिसांनी पकडले आहे.त्यांच्याकडून एक गावठी बंदूक आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. ग्रामीण भागात सुद्धा कट्टे,बनावट पिस्तूल,गावठी पिस्तूल बाळगणे म्हणजे मोठे पणाचे लक्षण आहे असा गोड गैर समज तयार झाला आहे.
पोलीस अंमलदार हकीमखान सुलेमानखान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ७ मे रोजी रात्री सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके,पोलीस अंमलदार सोनसळे,नंदगावे हे गस्त जरि असतांना त्यांना मिळालेल्या गुप्त माहिती प्रमाणे एका चारचाकी गाडीत पिस्तूल आहे.पोलीस पथकाने अंजनखेड पुलाजवळ चारचाकी गाडी क्रमांक एमएच २० सीएस ०३७० ला थांबवले आणि तपासणी केली तेव्हा त्यात एक गावठी पिस्तूल सापडले.त्यातील एक माणूस शेख मोहसीन शेख सुलेमान (२३) रा.दत्तनगर माहूर हा आहे.दुसरा विधी संघर्षग्रस्त बालक आहे.पोलिसांनी १ लाखाची चारचाकी गाडी आणि पिस्तूल ११६० रुपयांचे असा मुद्देमाल जप्त केला आहे.या दोघांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.