14 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणारा डॉक्टर पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका 43 वर्षीय डॉक्टाराने 14 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर केले. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केल्यानंतर आज 8 मे रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी. डिगे यांनी डॉक्टरला 12 मे पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असणाऱ्या खाजगी डॉक्टर विकास विजयकुमार सुंकरवार (43) यांच्या दवाखान्यात काम करण्यासाठी एक अल्पवयीन बालिका येत असे. चार दिवसांपुर्वी तिला पोटात त्रास आहे याची तपासणी करण्यासाठी त्या बालिकेच्या कुटूंबियांनी तिला दवाखान्यात नेले तेंव्हा अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली.ती बालिका चार महिन्याची गरोदर होती. उपचारादरम्यान तिचा गर्भपात झाला. त्यानंतर ही माहिती पोलीसांना प्राप्त झाली. किनवट पोलीसांनी 14 वर्षीय बालिकेवर नोव्हेंबर 2021 ते मार्च 2022 दरम्यान लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या डॉक्टर विकास विजयकुमार सुंकरवार (43) याच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 82/2022 दाखल केला. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 376, 506, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम 4 आणि 6 नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अभिमन्यु सोळुंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक हणमंत घुले यांच्याकडे देण्यात आला.
आज दि.8 मे रोजी पोलीस उपनिरिक्षक हनमंत घुले, पोलीस अंमलदार भगवान महाजन, फड, कुरेशी आदींनी अटक केलेल्या डॉ.विकास सुंकरवाडला न्यायालयात हजर केले. जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.आशिष गोधमगावकर यांनी पोलीस कोठडी देणे का आवश्यक आहे याचे सविस्तर विवेचन न्यायालयासमक्ष केल्यानंतर न्यायाधीश एस.बी.डिगे यांनी डॉ.विकास सुंकरवाडला 12 मे 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *