
“दबावों के बिच गरीमा बनाये रखनाही पराक्रम है’, ही शब्द रचना अर्नेस्ट हेमिंग्वे यांची आहे. अशाच कांही परिस्थितीत नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांना जन्मदिनाच्या शुभकामना देतांना “कुछ शख्स दुनिया में ऐसे भी बनाता है खुदा उदासीया जिनके चेहरेपर अच्छी नहीं लगती’ असेच आपले जीवन असावे या शब्दांसह पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांना जन्मदिनी हार्दिक शुभकामना..
शिरुरअनंतपाळ जिल्हा लातूर या गावात डॉ.पिरमोहम्मद तांबोळी यांच्या घरी जन्मलेल्या निसार तांबोळी यांना प्राथमिक शिक्षण सैनिकी विद्यालय सातारा येथे घेतल्यानंतर त्यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून कृषी पदवी प्राप्त केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण करून त्यांनी पोलीस उपअधिक्षक पद प्राप्त केले. प्रशिक्षण कालावधी पुर्ण करून त्यांना पहिली नियुक्ती सन 1996 मध्ये हिंगोली जिल्ह्यात झाली त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील भोकर उपविभागात प्राप्त झाली. आज उपलब्ध असणाऱ्या सुविधा त्या काळात नव्हत्या. भोकर नांदेड येथून 40 किलो मिटर अंतरावरच आहे पण भोकर उपविभागाची व्याप्ती मात्र मोठी होती. त्या ठिकाणी काम करतांना अनेक अडचणीपण आल्या. पण अत्यंत समर्थपणे तोंड देत त्रासाच्या काळात हसणे याला खुप महत्व आहे. हे समजून घेत निसार तांबोळी यांनी आपला कार्यकाळ पुर्ण केला.त्यानंतर त्यांची बदली अमरावती जिल्ह्यात झाली. हळूहळू आपल्या पोलीस जीवनातील एक-एक पद प्राप्त करत त्यांनी पोलीस उपमहानिरिक्षक पद प्राप्त केले. सन 2013 मध्ये भारतीय पोलीस सेवेत आपले स्थान निश्चित केले आणि आपल्या जीवनात प्रयत्न खरे आणि विश्र्वास या तिन शब्दांना केंद्रस्थानी ठेवून आपले कामकाज सुरू ठेवले. खरे काम स्वत:वर विश्र्वास आणि चांगल्यासाठी प्रयत्न असे करत-करत त्यांनी गाठलेल्या पोलीस उपमहानिरिक्षक पदात त्यांना नांदेड जिल्हा विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयात विशेष पोलीस महानिरिक्षक पद अवनत करून निसार तांबोळी यांची नियुक्ती पोलीस उपमहानिरिक्षक या पदावर दि.2 सप्टेंबर 2020 रोजी करण्यात आली.
नांदेड पोलीस परिक्षेत्रात काम करतांना लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याचा कारभार त्यांना नियंत्रीत करायचा आहे आणि नेहमी आपल्या जीवनात चांगल्या बाबींना स्थान देत नेहमी आपले मस्तक खालीच राखले आणि त्याच्या परिणामात त्यांना यशाचा आशिर्वाद मिळत गेला. अडचणीत असलेल्या व्यक्तीला निसार तांबोळी यांनी नेहमीच जपले. कारण त्याच्या मनात तयार होणारी ती जागा त्यांना हवी होती. स्नेह, सेवा आणि सहानुभूतीमध्येच ईश्र्वर प्राप्त होतो. या विचारांवर आधारीत नांदेड पोलीस परिक्षेत्राचा कारभार चालवतांना सर्वसामान्य माणसाचे काम व्हावे आणि आपल्या माणसांना त्याचा त्रास होवू नये असा विचार ठेवून केलेल्या कामांमुळे आज त्यांच्या जन्मदिनीपर्यंत त्यांना कोणताही त्रास जाणवला नाही. विचारवंत सांगतात की जो पाण्याने अंघोळ करेल तो पोशाख बदलू शकतो. पण जो घामाने अंघोळ करेल तो ईतिहास बदलून शकतो. या उक्तीवर आधारीत नांदेड पोलीस परिक्षेत्राचे काम काज चालवतांना आपल्याकडेच अर्थ नाही तर इतरांकडे अर्थ असतो या सत्य परिस्थितीला समजून त्यांनी आपले कामकाज चालवले. कोणालाही चुकीचे समजण्याअगोदर त्या माणसाच्या परिस्थितीला समजण्याचे प्रयत्न निसार तांबोळी यांनी नेहमी केले. कारण आपण खरे असलो तरी आपल्या समोरचा व्यक्ती चुकीचा असू शकत नाही या विचारांवर आधारीत काम काज चालवल्याने पोलीस परिक्षेत्रात त्यांच्या बद्दल एक आदराची भावना आहे.

कधी तरी निसार तांबोळी यांचे मन उदास झाले असेल त्यावेळी तुला काय हव आहे असा प्रश्न त्यांना विचारला गेला असेल तर नक्कीच त्यांनी मला पुन्हा एकदा लहान व्हायचे आहे असेच म्हटले असेल. कारण लहानपणी रडले असतांना कोणी लक्ष देत नव्हते. आजच्या जीवनात आपल्या डोळ्यातून एक अश्रु जरी निघाला तरी प्रश्नांचा डोंगर उभा केला जातो आणि या उत्तराच्या डोंगरावर चढतांना जी त्रासदायक प्रक्रिया पार करावी लागते. या परिस्थितीत सुध्दा निसार तांबोळी यांनी , मुझे दर्द से शिकवा नहीं है, ऐ “खुदा’ बस दर्द में मुस्कुराने की कला मुझे बख्शते रहना । या विचाराने ईश्र्वराकडे आपल्यासाठी हसण्याची मागितलेली ताकत त्यांच्या जीवनाला अत्यंत दमदार पणे पुढे नेत आहे. यासाठी त्यांनी विचारवंताच्या, जिंदगी की दास्तान भी कितनी अधुरी है, खुश दिखना खुश होणेसे जादा जरुरी है। या शब्दांना आपल्या जीवनात आणले आणि आपण नेहमी आनंदीत आहोत हेच दाखवत राहिले. आपल्या जीवनात दोन झाडे अशी आहे की जी कधीच कोमेजली जात नाहीत. एक निस्वार्थ प्रेम आणि दुसरा अतुट विश्र्वास या दोन झाडांच्या छायेत निसार तांबोळी यांनी आपले जीवन चालवले.
आपल्यासोबत राहण्याची इच्छा राखणारे अनेक जण असतील अशी इच्छा त्यांनी ठेवण्यामध्ये जो प्रेमभाव आहे तो प्रेमभाव आपण ओळखण्याची गरज आहे. सोबतच आपण जेंव्हा कोणाला, स्तुतीचा “वा’ देखील योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पडावा, भल्या ठिकाणी “वा’ दिल्यावर “नर’ देखील “वानर’ होण्याची भिती असते. हे लक्षात ठेवा आणि आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येकावर बारकाईने लक्ष ठेवा. आपले पोट भरले तर आपल्या शरिराला त्याचा त्रास होतो. पण आपले कान भरले गेले तर त्यामुळे अनेक नात्यांचा शेवट होतो या शब्दांसह आपल्याला जन्मदिनी ईश्र्वराने ही शक्ती द्यावी की, गरीबांचे अश्रु पुसणारे आपले हात सदा बळकट राहावे हीच शुभकामना….
-रामप्रसाद खंडेलवाल, नांदेड