नांदेड(प्रतिनिधी)-तामसा ता.हदगाव येथे एक घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 92 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. शहरातील सुंदरनगर भागामध्ये 25 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेला आहे. शहरातील वजिराबाद चौकासमोरून एक 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी चोरीला गेली आहे.
ओम सुभाष डोणगावे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 मे च्या दुपारी 12 ते 9 मेच्या मध्यरात्री 3 वाजेदरम्यान त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले 2 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 3 लाख 92 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तामसा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक बालाजी किरवले अधिक तपास करीत आहेत.
अनिरज अनिल कुपटीकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.26 फेबु्रवारीच्या सकाळी 9 ते 10 वाजेदरम्यान सुंदरनगर भागातून त्यांचा मोबाईल बळजबरीने चोरून नेण्यात आला आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार नागरगोजे हे करीत आहेत.
सय्यद ईस्माईल सय्यद कासम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 मे रोजी दुपारी त्यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ई.6831ही 15 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार राठोड अधिक तपास करीत आहेत.
तामसा येथे घरफोडून 3 लाख 92 हजारांचा ऐवज लंपास