नांदेड(प्रतिनिधी)-भुखंडांचे श्रीखंड खाण्याचा धंदा भारतभर सुरूच आहे. याच अनुशंगाने नांदेडमध्ये बनावट दस्तऐवज, खोटे लेआऊट, तयार करून भुखंडातून श्रीखंड खाणाऱ्या तीन पुरूष आणि एका महिलेविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रभारी सहदुय्यम निबंधक वर्ग-2नांदेड अशोक बाबूराव धोंडगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दुय्यम निबंधक कार्यालयात दि.8 एप्रिल 2022 ते 20 एप्रिल 2022 दरम्यान शकुंतलाबाई विश्र्वनाथ रेणापूरकर, भरत विश्र्वनाथ रेणापूरकर, किशोर अनंतराव रेणापूरकर, बलभिम विश्र्वनाथ रेणापूरकर या चौघांनी विविध भुखंडांचे नोंदणीकृत खरेदीखत तयार करून अनेक लोकांना बनावट व खोटे अकृषीक (एनए)परवाने आणि बनावट लेआऊट तयार करून अनेक लोकांना नोंदणीकृत विक्री खताआधारे नोंदणी करून फसवणूक केली आहे. या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 468, 471, 34 आणि सोबत नोंदणी अधिनियम कलम 82आणि 83 नुसार गुन्हा क्रमांक 184/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर हे करीत आहेत.
भुखंडांचे श्रीखंड करणाऱ्या रेणापूरकर कुटूंबियांविरुध्द गुन्हा दाखल