नांदेड(प्रतिनिधी)-एका शिक्षकाची फसवणूक करून ठकसेनांनी त्यांच्या खात्यातून 93 हजार 375 रुपये काढून घेतले आहेत.
शिक्षक असलेले अनंत रामचरण वर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 फेबु्रवारी 2022 ते 1 मार्च 2022 दरम्यान कोणी तरी ठकसेनांनी एसबीआय शाखा माहुर येथून त्यांच्या खात्यातील 93 हजार 375 ऐवढी रक्कम ऑनलाईन पध्दतीने काढून घेतली आहे. माहुर पोलीसांनी तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(ड) नुसार गुन्हा क्रमांक 48/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक नामदेव रिठे हे करीत आहेत.
शिक्षकाची ऑनलाईन 93 हजारांची फसवणूक