काही वळण रस्ते
नांदेड(प्रतिनिधी)-दि.14 मे रोजी शहरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यासह असंख्य मंत्री येणार आहेत. त्यांच्या कार्यक्रमात जाण्या-येण्याचा रस्ता सुचिनिश्चित राहावा म्हणून पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी शहरातील नागरीकांसाठी काही मार्गांमध्ये बदल केला आहे आणि एक मार्ग वाहतुकीसाठी पुर्ण पणे बंद ठेवला आहे. प्रमोद शेवाळे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, शहरात असणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भाने जनतेला त्रास होवू नये म्हणून सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा.
दि.14 मे रोजी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार तसेच महाराष्ट्र राज्याचे अनेक मंत्री नांदेड शहरात येणार आहेत. त्यांच्या हस्ते बॅंकेचे उद्घाटन आणि भगिरथनगर येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. या कारणासाठी वाहतुकीची कोंडी होवू नये आणि व्हीआयपीच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून, शहरातील नागरीकांच्या प्रवासात अडचण येवू नये म्हणून दि.14 मे 2022 रोजी सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेदरम्यान काही वाहतुक मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. वाहतुकीकरीता येण्या-जाण्यास पुर्णपणे बंद असलेला मार्ग शेतकरी चौक, दिपनगर, छत्रपती चौककडे जाणाऱ्या मार्गांचा समावेश आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे आहेत. शेतकरी चौक-कॅनॉल रोड-छत्रपती चौक, शासकीय विश्रामगृह-पावडेवाडी चौक-मोर चौक-छत्रपती चौक, छत्रपती चौक-मोर चौक, पावडेवाडी नाका. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, त्यांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा अवलंब करून आपला प्रवास सुखकर करावा.
14 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 दरम्यान शहरातील कांही वाहतुक मार्ग बंद- पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे