आरोग्य विभाग, जि.प.नांदेड यांच्या वतीने बालकांमधील दृष्टीदोष निवारणासाठी लो व्हिजन कार्यशाळा संपन्न

नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बालकामधील दृष्टीदोषांचे निवारण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील वैद्यकिय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या करीता आरोग्य विभाग जि.प. नादेड यांच्या वतीने तो व्हिजन कार्यशाळेचे नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे दिनांक 13 में -2022 रोजी आयोजन करण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकार श्रीमती वर्षा ठाकूर चुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, मुंबई येथील प्रसिद्ध नेत्ररोग तम डो. योगीता गांधी यांनी दिपप्रज्वलन करून कार्यशाळेचा शुभारंभ केला.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्याने जि. प. नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकार श्रीमती वर्षा ठाकूरघुगे यांच्या संकल्पनेतून जि. प. आरोग्य विभागामार्पत ग्रामीण भागातील सर्व अंगणवाडी या शाळेतील एकूण 5 लक्ष 33 हजार 267 बालकांची दिलाक 1 जानेवारी 2022 से दिनांक 30 एप्रिल 2022 या कालावधीत दृष्टीदोष व कर्णदोष बाबतीत आरोग्य तपासणी करण्यात आली होती. सदर तपासणी मध्ये आळशी डोळा असलेली 262, मोतीबिंदु असलेली 59 तिरळेपणा असलेली 1096 व इतर नेत्रदोष असलेली 2882 बालये आढळून आली होती. सदरील बालकावर ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय करण्यात आले असून व 104 बालकावर शासकिय वैद्यकिय महाविद्यालय नादेड येथे शस्त्रकिया करण्यात येत आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी प्रस्ताविक करताना आरोग्य विभाग जि.प. नांदेड, लॉयन्स क्लब व सुनो प्रकल्प याच्या संयुक्त विद्यमाने बालकामधील दृष्टीदोष व कर्णदोष बाबत करण्यात येणा-या तपासणी मोहिमेमुळे ग्रामीण भागातील बालकांना विशेष लाभ मिळला असून ग्रामीण भागातील पालकात बालकांमधील दृष्टीदोष व कर्णदोषाबाबत जागरुकता निर्माण करण्यात आली. सूनो प्रकल्पाचे संचालक डॉ. लक्ष्मीकांत बजाज व डॉ. अर्चना बजाज यांचे मोलाचे सहकार्य या मोहिमेस मिळाले. असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील बालकाचे दृष्टीदोष व कर्णदोष बाबत वेळेत निदान होऊन त्यांना उपचार देणे शक्य झाले आहे. आरोग्य विभागातील डॉक्टर आरोग्य कर्मचारी यांना वेतन सोबत सामाजिक कार्याची संधी मिळत असून स्वतः पालक असलेले डॉक्टर हे सामाजिक पालकही आहेत. त्याच्यामुळे गरजूंना वेळेत सेवा मिळत आहे. वेळेत आजारांचे निदान व उपचार मिळणे गरजेचे असून बालकांच्या आजारांबायत पालकांनाही सजग व जागरूक होणे गरजेचे असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकार श्रीमती वर्मा ठाकूर घुगे यांनी सांगितले.

तसेच या मोहिमेतील 50 बालकांना लो व्हिजन करीता थेरपी देणे आवश्यक असल्याने मुंबई येथील प्रसिध्द नेत्ररोग तज्ञ डा. योगीता गांधी यांच्या कडून बालकामधील दृष्टीदोषांबाबत जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील वैद्यकिय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी तसेच अल्पदृष्टी असलेल्या बालकांचे पालक यांना सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नेत्ररोग तज्ञ डॉ. योगीता गांधी व त्यांचे सहाय्यक श्रेया गडकर व सुरज गुप्ता यांच्यातर्फे कार्यशाळेत त्यानाही यावेळी प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. आरोग्य विभाग जि.प. नांदेड यांचेवतीने 50 बालकांना लो व्हिजन करीता थेरपी देण्यासाठी किटचे वाटप यावेळी करण्यात आले.

सदरील कार्यशाळम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकठ भोसीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. संतोष सुर्यवंशी, प्रशासकिय अधिकारी डॉ. अनिल रुईकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री सुभाष खाकरे, लायन्स क्लबचे डॉ. अरुण तोणिवाल, श्री शिवप्रसाट टाक श्री प्रफुल्ल अग्रवाल उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *