ऍड. मोहंमद बाहोद्दीन मोहंमद अहेमदोद्दीन यांचे निधन

 आज रात्री 9.30 वाजता आसरानगर येथे होणार अंतिमसंस्कार
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील जुन्या पिढीतील व्यक्ती ऍड.मोहंमद बाहोद्दीन मोहंमद अहेमदोद्दीन (76) यांचे आज निधन झाले. विविध क्षेत्रात प्रसिध्द असलेल्या ऍड. मोहंमद बाहोद्दीन यांच्यावर आज रात्री 9.30 वाजता आसरानगर येथील स्मशानभुमी (कब्रस्तान) येथे अंतिमसंस्कार होणार आहेत.
1 जून 1946 रोजी जन्मलेले ऍड.मोहंमद बाहोद्दीन यांनी विज्ञानपदवी प्राप्त केल्यानंतर कायद्याच्या विषयात पदवी प्राप्त केली. हिंदी, मराठी, उर्दु, इंग्रजी आणि तेलगु भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून 1989 ते 2009 असे 20 वर्ष त्यांनी काम केले. दोन वेळेस उर्दु ऍकॅडमीमध्ये ते सदस्य होते. वफ बोर्डाचे ते समन्वयक होते. ऍड.मोहंमद बाहोद्दीन हे वफ बोर्ड, नॅशनल इन्सुरन्स कंपनी, विज वितरण कंपनी यांच्या पॅनलवर काम केलेले व्यक्ती होते. मदरसे मदिना तुल उलूम या उर्दु शिक्षण संस्थेमध्ये ते मॅनेजिंग कमेटीचे ते सदस्य होते. या उर्दु शाळेच्या माध्यमातून 10 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. या उर्दु शाळेच्या भोकर आणि नांदेडमध्ये अनेक शाखा आहेत त्या 1964 पासून आजपर्यंत सुरू आहेत.मराठवाडा उर्दु एजुकेशन सोसायटी औरंगाबादचे ते सहसचिव होते. या संस्थेच्या औरंगाबाद, बीड, परभणी, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि हिंगोली येथे विविध कामकाज चालते. शिक्षणामध्ये आपल्या समाजाच्या मुलांना जास्तीत जास्त वाव कसा मिळवता येईल यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले.महाराष्ट्र उर्दु साहित्य अकादमीच्यावतीने आसरी अफकार-2019 ही उपाधी त्यांना मिळाली. त्यांनी लिहिलेले “गोया के ये भी मेरे दिल में है’ पुस्तक सध्या छापण्याच्या परिस्थितीत आहे. इंडियन एक्सप्रेस आणि इतर जागी छापलेल्या अनेक उर्दु लेखाबाबत त्यांनी उर्दु शिषर्क “कसोटी’ या नावाखाली तयार केलेले पुस्तक सुध्दा प्रसिध्द होणार आहे. कांही इंग्रजी लेख त्यांनी उर्दुमध्ये ट्रान्सलेट केले आहेत. ते पुस्तक सुध्दा “कशीदा पर’ या नावासह तयार होत आहे. ते मुद्रणात आहे.त्यांचे अजुन एक पुस्तक “अफकार ए ईमरोज’ हे पुस्तक सुध्दा छपाईच्या मार्गावर आहे. सोबतच “दरीया है के बहता जा रहा है’ हे पुस्तक सुध्दा प्रसिध्दीत आहे.
ऍड.मोहम्मद बाहोद्दीन मोहम्मद अहमोद्दीन यांची मुले डॉ.बदीउद्दीन जे महानगरपालिकेच्या दवाखान्यात काम करतात. ऍड.मोहीयोद्दीन उर्फ मोईद हे न्यायालयात काम करतात. मोहंमद शजियोद्दीन नवीद हे हैद्राबाद येथे शास्त्रज्ञ आहेत. ऍड.मोहंमद मोईनोद्दीन हे वकील आहेत. त्यांच्या कन्या अर्जुमंदबानो यासमीन या कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक आहेत.
त्यांच्या निकटवृत्तीयांनी कळविले की, दिवंगत ऍड. बाहोद्दीन अहमोद्दीन (76) यांच्यावर रात्री 9.30 वाजता आसरानगर स्मशानभूमी(कब्रस्तान) येथे अंतिम संस्कार होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *