सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा नांदेड दौरा

नांदेड (प्रतिनिधी) – राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.

शनिवार 14 मे 2022 रोजी मुंबई येथून खाजगी विमानाने सकाळी 9.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 9.35 वा. नांदेड विमानतळ येथून तरोडा नाकाकडे प्रयाण. सकाळी 10 वा. गोदावरी अर्बन सहकारसूर्य मुख्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- सहकारसूर्य तरोडानाका नांदेड. सकाळी 11.45 वा. तरोडानाका येथून मोटारीने वाई ता. वसमतकडे प्रयाण. दुपारी 3.30 ते 4.30 यावेळेत शरदचंद्रजी पवार यांच्या समवेत राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते सेाबत बैठकीला उपस्थिती स्थळ- सर्किट हाऊस नांदेड. दुपारी 4.30 वा. शरदचंद्रजी पवार यांच्या पत्रकार परिषदेस उपस्थिती. स्थळ- सर्किट हाऊस नांदेड. सायं. 5.15 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन भेट नांदेड. सायं. 5.30 वा. इन्स्टिटयुट ऑफ मेडिकल सायन्सेस ॲण्ड रिसर्च सेंटर भूमिपूजन सोहळा. स्थळ- सामाजिक न्याय भवनाच्या बाजुस नमस्कार चौक नांदेड. सायं 6.30 वा. कमलकिशोर कदम एमजीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या 75 व्या अमृत महोत्सव सोहळ्यास उपस्थिती. स्थळ माधवसवाड इस्टेट नमस्कार चौक नांदेड. रात्री 8.30 वा. एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालय येथे राखीव. यानंतर सोयीनुसार परळी जि. बीड कडे प्रयाण करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *