नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याअंतर्गत उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 15 ते 30 मे 2022 दरम्यान नांदेड जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय आणि नांदेड जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. फुटबॉल शौकीनांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन नांदेड जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव के.आर.अन्सारी यांनी केले आहे.
या प्रशिक्षण शिबिरात 14 वर्षापर्यंत , 17 वर्षापर्यंत आणि 19 वर्षापर्यंतच्या खेळाडूंनी आपल्या वयोगटातील विहित प्रमाणे शाळेचे बोनाफाईड सर्टीफिकेट आणि जन्मप्रमाणपत्र दोन फोटोंसह 15 मे रोजी सकाळी 7 वाजता एनटीसी मिल ग्राऊंड येथे उपस्थित राहुन वाजिद दाद खान मो.नं.9021514628 किंवा राकी पिल्लीय यांच्याकडे संपर्क साधावा. या प्रशिक्षण शिबिरातून जून महिन्यात होणाऱ्या लिग स्पर्धेकरीता खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणात सहभागी सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येतील. तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या प्रशिक्षण शिबिरात नोंदणी करून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन के.आर.अन्सारी यांनी केले आहे.
15 ते 30 मे दरम्यान नांदेड येथे फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन