नांदेड(प्रतिनिधी)-आज दि.15 मे रोजी सायंकाळी 6 नंतर मध्यरात्रीपर्यंतचा काळ नांदेड जिल्ह्यासाठी सावधानता बाळगण्याचा काळ असल्याची माहिती हवामान खात्याने जारी केली आहे.
हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार 15 मे रोजी सायंकाळी 6 नंतर पुढील 6 तास अर्थात मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यात वादळी वारे 30 ते 40 किलो मिटर प्रति तासाच्या वेगाने वाहतील. सोबतच काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, धुळ असलेले वारे वाहतील. यामुळे आपल्या स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने स्वत:ला सुरक्षीत स्थळी ठेवावे. नांदेड जिल्ह्यातील जनतेने याबात जास्तीची दक्षता घेण्याचे आवाहन हवामान खात्याने व्यक्त केले आहे.
वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने सुध्दा आम्ही जनतेला आवाहन करत आहोत की, आपल्या आणि आपल्या कुटूंबियांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने वादळी वारे, जारेदार वाहणारे वारे आणि अचानक पडणाऱ्या पावसापासून स्वत: ची सुरक्षा करण्यासाठी सुरक्षीत स्थळी राहा.
पुढील सहा तास नांदेड जिल्ह्याने सावधानता बाळगावी