
नांदेड,(प्रतिनिधी)- आज दुपारी २.३० वाजेच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पाठीमागे उभ्या असलेल्या काही चारचाकीनां आग लागली.अग्निशमन दलाच्या जवानांनी हि आग आटोक्यात आणली.
आज दुपारी २.३० अचानक आग लागली.तेव्हा हल्लकोळ माजला. शिवाजीनगरचे अनेक पोलीस अधिकारी,पोलीस अमंलदार आदी धावपळ करू लागले.कोणीतरी अग्निशमन दलाला या बाबत माहिती दिली.लगेच आग विझवणारा बंब आला.त्या जवानांनी मेहनत करून लगेच आग विझवली.या दरम्यान तेथील अनेक झाडांना आग लागली.पण काही जीवित हानी झाली नाही.प्राप्त झालेल्या माहितीनुसार आग लागलेल्या दुचाकी गाड्या अनेक गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या होत्या.तसेही त्या चारचाकी गाड्यांचा सांगाडाच होता.आग का लागली असेल याबाबत सविस्तर माहिती प्राप्त झाली नाही.