नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात दोन जबरी चोरी, तीन घरफोड्या आणि तीन दुचाकी चोऱ्या घडल्याच्या नोंदी पोलीस दप्तरी दाखल आहेत. या सर्व चोरी प्रकारामध्ये एकूण 5 लाख 92 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
भोकर येथील मारोती रामराव इरवाड हे 17 मे रोजी दुपारी 3 वाजता भोकर तालुक्यातील विटा घाटातून दुचाकीवर जात असतांना दुसऱ्या दुचाकीवर आलेल्या तीन दरोडेखोरांनी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवत बॅगमधील 58 हजार रुपये आणि खिशाच्या पॉकीटमधील 1600 रुपये असा एकूण 59 हजार 600 रुपयांचा ऐवज लुटला आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक रसुल तांबोळी अधिक तपास करीत आहेत.
काजी मुन्वरोद्दीन शफीयोद्दीन हे मॅकेनिक 17 मे रोजी सकाळी 8 वाजता हरबभ मार्गे सोनखेडकडे येत असतांना त्यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.यु.6611 अडवून दोन जणांनी त्यांना आणि त्यांच्या मित्राला मारहाण करून खिशातील रोख रक्कम 5500 रुपये आणि सोन्याची अंगठी असा 20 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. सोनखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक चंदनसिंह परिहार अधिक तपास करीत आहेत.
मौजे गऊळ ता.कंधार येथील भुजंग शिवाजी गिरे या शेतकऱ्याचे आणि त्याच्या शेजारचे मंडळी 17 मे रोजी रात्री गच्चीवर झोपले असतांना चोरट्यांनी त्यांचे आणि त्यांच्या शेजाऱ्याचे घरफोडले त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 2 लाख 52 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. कंधार पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक केंद्रे हे करीत आहेत.
सावरगाव माळ ता.भोकर येथील मन्मथ गंगाधर हुरणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16-17 मेच्या रात्री त्यांच्या घराचे गेट तोडून कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाट फोडले. त्यातील सोन्या-चांदीचे दागिणे असा 67 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. भोकर पेालीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार देवकांबळे अधिक तपास करीत आहेत.
नितीन उध्दवराव सामले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 मे रोजी दुपारी विष्णुपूरी येथील सहयोग कॉम्प्लेक्सच्या बाजूचे एटीएम कोणी तरी फोडले त्यांनी जावून तपासणी केली असता तेथील चोरटा राम शामराव वैद्य हा दगडाच्या सहाय्याने आणि हाताने एटीएम फोडून पैसे काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याला पकडून नांदेड ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. या चोरट्याने एटीएम मशीन फोडून तिचे 1 लाख रुपयंाचे नुकसान केले आहे. नंादेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गवळी अधिक तपास करीत आहेत.
नांदेड शहरातील वजिराबाद भागातून एक 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी तसेच हिमायतनगर भागातून दुसरी 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 15 हजार रुपयांची तिसरी दुचाकी अशा तीन दुचाकी गाड्या चोरीला गेल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे.
दोन जबरी चोरी, तीन घरफोडी आणि तीन दुचाकी चोरी