नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील दरोड्याचा प्रकार स्थानिक गुन्हा शाखेने उकडकीस आणला; तीन जणांना मुद्देमालासह अटक

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 14 तास उशीरा दाखल केलेल्या दरोडा प्रकरणातील आरोपी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास विखलीकर यांच्या सहकाऱ्यांनी शोधू काढले. पुढील कार्यवाहीसाठी या दरोडेखोरांना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दि.15 मे रोजी रात्री 10 वाजता सय्यद अतिक सय्यद रशिद रा.वाजेगाव हे आठवडी बाजारातील व्यवसायातून जमलेले पैसे आपल्या दुचाकी गाडीच्या डिकीत ठेवून घरी जात असतांना वाजेगाव जवळील कापूस संशोधन केंद्रासमोर त्यांना दुचाकीवर आलेल्या तीन दरोडेखोरांनी त्यांच्या अंगावर मिर्चीची पुड टाकून, त्यांना तलवारीचा धाक दाखवून त्यांना पळायला लावले आणि त्यानंतर ती स्कुटी घेवून दरोडेखोर पळून गेले. सय्यद आतिक सय्यद रशिद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्कुटीमध्ये 4 लाख 60 हजार रुपये होते आणि 70 हजार रुपयांची दुचाकी असा 5 लाख 30 हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटला होता. हा गुन्हा 14 तास उशीरा नांदेड ग्रामीण पोलीसांनी दाखल केला होता. या गुन्ह्याचा क्रमांक 286/2022 असा आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना प्राप्त झालेल्या अत्यंत खात्रीलायक आणि गुप्त माहितीनुसार त्यांनी आपल्या सोबत काम करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक श्री.गोविंदरावजी मुंडे साहेब, शाहु, पोलीस अंमलदार मोतीराम पवार, मारोती तेलंगे, विलास कदम, शेख कलीम यांना सोहेब खान सब्बीर खान (19) रा.वाजेगाव, मुदखेड वळण रस्ता यास पकडण्यास पाठविले. पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की, हा गुन्हा त्यांना दिलेल्या टिपच्या आधारे घडविण्यात आला होता. एकूण 5 जण या गुन्ह्याचे भागिदार आहेत. सय्यद आतिक पळून गेल्यानंतर त्याची स्कुटी घेवून पाच जण जवाहरनगर येथील शासकीय गोदामाजवळ गेले तेथे डिकितील रोख रक्कम काढली आणि त्याची समान वाटणी केली. दुचाकी तेथेच सोडून दिली. पकडलेल्या सोहेब खानने दिलेल्या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सोहेब खान शब्बीर खान (19) रा.वाजेगाव, नुरखान हुसेनखान पठाण (35) रा.वसरणी नांदेड, सय्यद ताहेर सय्यद अब्दुल (34) रा.वाजेगाव यांना ताब्यात घेतले. या दरोडेखोरांनी सांगितल्याप्रमाणे वाजेगाव येथील शेख फेरोज आणि गोवर्धनघाट येथील आर्या उर्फ हरीशचंद्र हे सुध्दा सहभागी होते. पुढील तपासासाठी तिन आरोपी, कांही मुद्देमालासह नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
14 तास उशीरा दाखल झालेल्या गुन्ह्याची उकल स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाने कांही तासातच केली. ही कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, ईतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे आदींनी अभिनंदन केले आहे.
संबंधीत बातमी….

https://vastavnewslive.com/2022/05/17/जबरी-चोरीचा-गुन्हा-फक्त-१/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *