नांदेड(प्रतिनिधी)-मौजे फत्तेपूर लालवाडी येथील गोरगरीबांसाठी होणारी नाली, सीसी रोड या बाबत अनेक निवेदने देवून सुध्दा दाद दिली जात नाही म्हणून सुरेश राजेश गोमसाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाच्या निवेदनात पोलीस निरिक्षक नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे यांचा तात्काळ बदलीचा संदर्भ जोडण्यात आला आहे.
सुरेश राजेश गोमसाळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार मौजे फत्तेपूर लालवाडी येथील दलितवस्ती भागातील नागरीकांसाठी विविध कामे सुरू आहेत. तेथे शंकर सिताराम पचलिंगे यांचे पेट्रोलपंप आहे. या भागातील विकास होवू नये म्हणून पेट्रोलपंप मालकाने पैशांच्या जोरावर अनेक अधिकारी, कर्मचारी हाताशी धरले असून कोणतीही कार्यवाही करू नका असे सांगतात. त्यामुळे त्यांच्याविरुध्द कोणी तक्रारपण देत नाही. या ठिकाणी सोयी सुविधा लवकर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
माझी पंमचर दुकान आहे. ती दुकान पेट्रोलपंपच्या जवळ असल्याने तेथून ती काढा म्हणून पेट्रोलपंपाचे मालक पंचलिंगे मला त्रास देत आहेत. जातीवाचक शिवीगाळ करत आहेत. त्यांच्याकडून मला संरक्षण मिळावे असे एक जुने निवेदन जोडलेले आहे. याच निवेदनाच्या अर्जावर संदर्भ क्रमांक 2 मध्ये पोलीस निरिक्षक नांदेड ग्रामीण यांची तात्काळ बदली करावी असेही लिहिलेले आहे.
विविध मागण्यांसाठी सुरेश गोमसाळे यांचे आमरण उपोषण