साडे सहा वर्षीय आरोहीने धनुर्विद्या स्पर्धेत राज्यस्तरावर मिळवले यश

नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेडच्या साडे सहा वर्षीय आरोही जाधवने धनुर्विद्या स्पर्धेत मिळवलेले यश अनेकांसाठी उत्साहवर्धक आहे.

महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघटना व हिगोली आर्चरी असोसिएशनच्यावतीने वसमत येथे आयोजीत १४ वर्षाखालील व ९ वर्षाखालील राज्यस्तर मुले व मुली स्पर्धेत नांदेडच्या कु. आरोही प्रेम जाधव हिने ९ वर्षाखालील वयोगटात मिक्स प्रकारात कास्य पदक मिळवित जिल्हयाचे नाव राज्यस्तरावर प्रसिद्ध केले. त्याबद्ल तिचा आर्चरी स्कुल नांदेडच्यावतिने संचालिका तथा प्रमुख प्रशिक्षीका वृषाली पाटील जोगदंड . आरोहीचे आजोबा, वडील प्रेम जाधव, ज्ञानोबा नागरगोजे, सहाय्यक प्रशिक्षक स्वप्नील सोनुने, सतिश मुधोळकर यांच्यासह अनेकांनी पुप्प गुच्छ देवून सत्कार केला , आरोही केवळ साडेसहा वर्षाची असुन अल्पवयात तिने हे यश प्राप्त केले आहे त्याबाबत तिचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *