राज्यात ३०३ सहायक पोलीस निरिक्षक पदोन्नतीच्या विचाराधीन यादीत नांदेड पोलीस परिक्षेत्रातील १० जण

नांदेड,(प्रतिनिधी)- राज्यातील ३०३ सहायक पोलीस निरीक्षक आता पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी विचार यादीत आहेत.त्यांची सविस्तर माहिती मे महिन्याच्या शेवटच्या दिवसा पर्यंत पोलीस महासंचालक कार्यालयात पाठवायची आहे.असे आदेश आस्थापना विभागातील अपर पोलीस महासंचालक संजिव कुमार सिंघल यांनी राज्यभरातील पोलीस घटक प्रमुखांना पाठवले आहेत.या यादीत नांदेड -५, लातूर – ३ आणि परभणी – २ अश्या नांदेड पोलीस परिक्षेत्रातील १० सहायक पोलीस निरिक्षकांचा समावेश आहे.

पोलीस महासंचालक कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानूसार राज्यातील ३०३ सहायक पोलीस निरिक्षकांना पोलीस निरिक्षक अशी पदोन्नती देण्याचा विचार सुरु आहे. त्या संदर्भातील ३०३ सहायक पोलीस निरिक्षकांची विचाराधीन यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत नांदेड जिल्यातील शिवाजी विश्वनाथ लष्करे, रेवनाथ कोंडीबा डमाळे, बालाजी रामराव भंडे,शिवराम राजाराम तुगावे, महादेव हनुमंतराव मांजरमकर यांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील श्रीशैल्य महादेव कोले,व्यंकटेश सुग्रीव आलेवार, धनंजय सावताराम ढोणे यांचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यातील महेश बाळासाहेब लांडगे आणि कपिल पुंजाराम शेळके यांचा समावेश आहे.

या यादीतील ३०३ सहायक पोलीस निरिक्षकांची नावे पोलीस निरिक्षक पदोन्नती देण्याच्या विचाराधीन आहेत.कोणाला मिळते पदोन्नती हे आदेश निघतील तेव्हाच कळेल.

या बातमी सोबत सर्व ३०३ नावांची पीडीएफ यादीजोडलेली आहे.

पदोन्नती(1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *