नांदेड(प्रतिनिधी)-एका 55 वर्षीय महिलेला तुझ्या मुलाला लॉटरी लागली अशी बतावणी करून तिचे सोन्याचे दागिणे लांबविल्याचा प्रकार नमस्कार चौकाच्या जवळील सुपर मार्केट समोर घडला. किती किंमतीचे दागिणे गेले याचा उल्लेख पोलीसांनी आपल्या प्रेसनोटमध्ये केलेला नाही.
सकुबाई व्यंकटराव देवकांबळे रा.पांडूरंगनगर नमस्कार चौक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 18 मे रोजी सकाळी 8.30 वाजेच्यासुमारास नमस्कार चौकात एका अनोळखी गाडीवर अनोळखी माणुस आला आणि मावशी बरे आहात काय असे विचारणा करून एलआयसीमध्ये असलेल्या तुमच्या मुलाला दुचाकी गाडी, 1 लाख 10 हजार रुपयांची आणि दीड तोळ्याच्या सोन्याचे नकलेस अशी लॉटरी लागली आहे. ते बक्षीस मिळविण्यासाठी तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिणे वजन करून घ्यावे लागतील त्याशिवाय बक्षीस देता येणार नाहीत असे सांगितले. महिलेने आपले सोन्याचे दागिणे त्या ठकसेनाला दिले आणि तो ठकसेन पळून गेला. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस पोलीस निरिक्षक बिरकुले अधिक तपास करीत आहेत. लॉटरीच्या नावावर चोरट्यांनी महिलेचे किती रुपये किंमतीचे दागिणे लांबवले याचा उल्लेख पोलीसांनी आपल्या प्रेसनोटमध्ये केलेला नाही.