नांदेड(प्रतिनिधी)-एकट्या राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेचा खून करून तिचे प्रेत पाण्यात टाकल्याचा प्रकार 19 मे रोजी सकाळी उघडकीस आला.
गोपाल उत्तमराव उमरजकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पळसा ता.हदगाव शिवारात राहणाऱ्या ललिताबाई वसंत उमरजकर या एकट्याच राहतात. त्यांच्या एका मुलीचे लग्न झाले असून एक मुलगा पुण्यात खाजगी नोकरीमध्ये आहे. आपल्या शेतात जाणे-येणे, शेताची कामे पाहणे हे काम त्याच करतात. 18 मे रोजी सकाळी त्या आपल्या शेतात गेल्या होत्या. परंतू परत आल्या नाहीत. 19 मे रोजी सकाळी एका पाण्याच्या छोट्या तलावात त्यांचा मृतदेह तरंगतांना दिसला. त्यांची ओळख झाल्यानंतर त्यांचे नाव ललिताबाई वसंत उमरजकर (45) असल्याचे समजले. त्यांचा गळादाबून त्यांचा खून करण्यात आला होता आणि त्यांचे प्रेत पाण्यात फेकले होते. मनाठा पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे गुन्हा क्रमांक 95/2022 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण हे करीत आहेत.