नांदेड(प्रतिनिधी)-आज देशात सुरू असलेल्या ज्ञानव्यापी मस्जिद प्रकरणात नांदेड पोलीसांना दक्ष राहण्याच्या सुचना असतांना नांदेड शहर पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक यांनी विमानतळ, भाग्यनगर, शिवाजीनगर, वजिराबाद या चार पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षकांना आपल्या कक्षात सायंकाळी 7 वाजता हजर राहण्यास सांगितले आहे.
आज शहरातील व जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना दक्षतेच्या सुचना देण्यात आल्या होत्या. कारण देशात ज्ञानव्यापी मस्जिद प्रकरणात सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्या संदर्भाने पोलीसांनी दक्ष राहुन आपल्या जिल्ह्यात त्या विषयासंदर्भाने काही नवीन माहिती प्राप्त होते काय? हे शोधण्याची जबाबदारी देतांना अलर्ट राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार वृत्तलिहिपर्यंत तरी पोलीस या कामात व्यस्त होते.
या प्रकरणी प्राप्त झालेल्या एका आदेशानुसार नांदेड शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक श्रीमान चंद्रसेनजी देशमुख यांनी त्यांच्या अखत्यारीतील पोलीस ठाणे विमानतळ, भाग्यनगर, शिवाजीनगर आणि वजिराबाद यांच्या पोलीस निरिक्षकांना सायंकाळी 7 वाजता बिनचुकपणे स्वत:, पोलीस ठाण्याचे बारनिशी आणि त्या नोंदवह्या ज्यांच्यामध्ये वरिष्ठ कार्यालयाकडून आलेले अर्ज चौकशीसाठी प्रलंबित आहेत. हे घेवून हजर राहण्यास सांगितले आहे.
