नांदेड(प्रतिनिधी)-आज हिंसाचार आणि दहशतवाद विरोधी दिवसाच्या निमित्ताने पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी शपथेचे वाचन केले.
20 मे हा दहशतवाद व हिंचार दिवस म्हणून पाळला जातो. या संदर्भाने उपस्थित अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्या समक्ष पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी आम्ही भारताचे नागरीक आपल्या देशाच्या अहिंसा व सहीष्णूतेच्या परंपरेविषय दृढनिष्ठा बाळगतो. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपुर्वक प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानव जातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू , तो वृध्दींगत करू तसेच मानवीय जीवत मुल्य धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तीचा प्रतिकार करू.
या प्रसंगी पोलीस निरिक्षक प्रशांत देशपांडे, पवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे, बहात्तरे, नियंत्रण कक्ष, वाचक शाखा, आणि इतर शाखेतील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
हिंसाचार आणि दहशतवाद विरोधी दिनानिमित्त पोलीस अधिक्षक कार्यालयात शपथ