नांदेड, (प्रतिनिधी)- दि. 20 मे 2022 रोजी नांदेड जिल्ह्यात बाल विवाहातील प्रकरणात पोलिसांना मार्गदर्शन करणे हेतू महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ़ आणि एस बी सी 3 यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा आसना हॉल, पोलीस मुख्यालय, नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. सदर सत्राचे उदघाट्न गृह पोलीस डॉ.अश्विनी जगताप नांदेड यांच्या तर्फे करण्यात आले, बाल विवाहाची प्रकरणे थांबविण्यासाठी महिला व बाल विकास विभाग- जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड लाईन यांच्या सोबत समन्वय करून काम करणे तसेच समाजात बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 विषयी अधिक जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन त्यांनी केले.
सदर प्रशिक्षणासाठी डाॅ. अब्दुल रशिद शेख, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जिल्हा व विद्या आळणे,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, नांदेड उपस्थित होते.
मा. निशीत कुमार, एस बी सी 3, मुंबई आणि पूजा यादव, कार्यक्रम प्रमुख, एस बी सी 3, मुंबई यांनी प्रशिक्षकांना बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006, बाल न्याय कायदा 2015 व लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 तसेच बालकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची भूमिका या विषयी मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षण हे प्रशिक्षकांमार्फत प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येईल.
प्रशिक्षणात 78 विशेष बाल पोलीस पथक, पोलीस निरीक्षक, भरोसा सेल अधिकारी व कर्मचारी, अनैतिक मानवी व्यापार विरोधी विभागातील अधिकारी उपस्थित होते.