नांदेड,(प्रतिनिधी)- दोन वर्षा पूर्वी अनेकांना 89 लाखांना गंडा घालणाऱ्यां मध्ये नांदेड आयटीआय येथे व्यंकटेश्वरा मोबाईल शाँपीचे मालक संतोष गजाननराव बारडकर (47)यांचाही हातभार आसल्याचे समोर आल्या नंतर आज रात्री 8 वाजता आर्थिक गुन्हा शाखेने गाजाआड केले आहे.
सन 2020 मध्ये नांदेड शहराच्या वजीराबाद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात अनेक लोकांना मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य कमी किमतीत देण्याचे अमिष सबसे सस्ता डाँट काँम या संकेतस्थळावरुन दाखवण्यात आले. नांदेड आणि आसपासचे अनेक लोक यात फसले.89 लाखांना चुना लावणारे गायब झाले. आर्थिक व्यवहार मोठा असल्या कारणाने तपास आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला.
आर्थिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.एस. आरसेवार यांनी बिहार राज्यातून देशपाल श्रीवास्तव यास पकडून आणले तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
या प्रकरणात सुशांत घोष हा पण एक आरोपी असल्याचे दिसत असतांना सुशांत घोष आणि देशपाल श्रीवास्तव हे एकच व्यक्ती असल्याचे समोर आले.
पोलीस कोठडीतील देशपाल कडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर आर्थिक गुन्हा शाखेने आयटीआय जवळ असलेल्या व्यंकटेश्वरा मोबाईल शाँपीचे मालक संतोष गजाननराव बारडकर (47) यास तपासासाठी बोलावले.तेव्हा सबसे सस्ता डाँट काँम द्वारे जनतेची फसवणूक करण्यात बारडकरचा हात होता हे सिध्दच झाले.तेव्हा आज रात्री 8 वाजता नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेने त्यांना अटक करुन गजाआड केले आहे.