चंद्रसेन देशमुखच्या गुन्ह्याचा तपास आता विक्रांत गायकवाड यांच्याकडे हस्तांतरीत;विजय कबाडे यांचा आदेश 

नांदेड,(प्रतिनिधी)- आजच नांदेड शहराच्या वजीराबाद पोलीस ठाण्यात पोलीस उप अधिक्षक चंद्रसेन देशमुख यांच्या तक्रारीवरुन दाखल झालेला ट्रँव्हल्स मालक अनिल शर्मा विरुध्दचा गुन्हा तपासासाठी धर्माबादचे पोलीस उप अधिक्षक विक्रांत गायकवाड यांच्याकडे वर्ग करण्याचा आदेश नांदेडचे प्रभारी अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी जारी केला आहे.

नांदेड शहर उप विभागाचे पोलीस उप अधिक्षक चंद्रसेन देशमुख यांनी तक्रारीसह दिलेल्या आदेशानूसार शर्मा ट्रँव्हल्सचे मालक अनिल शर्मा यांच्या विरुध्द 1922 च्या कायद्यानूसार गुन्हा क्रमांक 170/2022 दाखल झाला. गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगदिश भंडरवार यांच्याकडे देण्यात आला. पण गुन्हा दाखल होताच काही तासातच हा गुन्हा विक्रांत गायकवाड यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.धर्माबाद नांदेड पासून 100 कि.मी. अंतरावर आहे.असो. त्यांची कारणे काय ? या बाबत शोध लावण्यात आम्ही अयशस्वी ठरलोत.

संबधित बातमी….

https://vastavnewslive.com/2022/05/22/ट्रॅव्हल्स-मालक-अनिल-शर्/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *