विमानतळ पोलीसांनी मनाठ्याचा फरार आरोपी पकडला ; 18 वाहनांकडून 12 हजार 500 रुपये दंड वसुल केला

नांदेड(प्रतिनिधी)-मनाठा पोलीस ठाण्यातील जबरी चोरी प्रकरणातील एका फरार आरोपीला विमानतळ पोलीसांनी पकडून मनाठा पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. तसेच 21 मे च्या रात्री वेगवेगळ्या तपासणी दरम्यान 18 वाहनांकडून 12 हजार 500 रुपये रोख दंड वसुल करण्यात आला आहे.
आज दि.22 मेच्या पहाटे 5 ते 8 वाजेदरम्यान विमानतळ पोलीस आरोपींची तपासणी करत असतांना विमानतळाच्या जवळ राहणाऱ्या सचिन परमेश्र्वर शिंदे (24) हा त्यांना घरी भेटला. सचिन शिंदे मनाठा पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 136/2021 मध्ये जबरी चोरी प्रकरणात फरार आहे. विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांनी मनाठाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण यांच्याशी संपर्क साधून सचिन परमेश्र्वर शिंदेचा ताबा त्यांना घेण्यासाठी बोलावले आहे.
काल रात्री विमानतळ पोलीसांनी सायंकाळी 7 ते रात्री 8.30 दरम्यान अनेक पोलीस अंमलदारांसह पायी गस्त केली. तसेच रात्री 8.30 ते रात्री 10 या दरम्यान शामनगर चौकी पवार टी हाऊस येथे लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान 75 वाहने तपासली. त्यापैकी 18 वाहनधारकांकडून 12 हजार 500 रुपये रोख दंड वसुल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *