नांदेड(प्रतिनिधी)- नावात पत्रकार असलेल्या एकासह चार जणांनी बाहेर जिल्यातून आलेल्या एका महिलेचा सार्वजनिक रस्त्यावर विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे.
वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत शॉपींगसाठी आलेल्या बाहेर जिल्ह्यातील एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्या आणि त्यांचे कुटूंबिय 20 मे रोजी नांदेड शहरात एका लग्नासाठी आले होते. त्यावेळी शॉपींग करतांना रविंद्रसिंघ कोचर, अमनदिपसिंग शिंदे, नानकसिंग पत्रकार आणि सोनु तोतरा या चार जणांनी मी शॉपींग करतांना माझ्या पाठलाग करत होते.त्यातील एका युवकाने माझ्या जवळ येवून वाईट उद्देशाने माझा हात धरला. माझा मुलगा त्याचा विरोध करत होता. तेंव्हा इतर तिघांनी त्यास मारहाण करून शिवीगाळ केली. झटापटीत माझ्या हाताच्या बांगड्या तुटल्या आणि त्यातून रक्त वाहू लागले. या लोकांनी वाईट उद्देशाने माझे कपडे फाडले. हा प्रकार 22 मे च्या सायंकाळी 7 वाजता सार्वजनिक रस्त्यावर घडला.
या तक्रारीनुसार वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 171/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 354(ड), 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय मंठाळे हे करीत आहेत.