नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील महिला सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकाने केरळ राज्यात आयोजित मास्टर्स गेम्स फेडेरेशन ऑल इंडिया यांच्यावतीने आयोजित खेळांमध्ये गोळाफेक, थाळीफेक आणि 100 मिटीर धावणे या स्पर्धांमध्ये यश मिळवले. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी महिला सहाय्यक पोलीस निरिक्षकांचे कौतुक केले आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलात पोलीस ठाणे ईस्लापूर येथे महिला सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गंगुताई पोशट्टी नरतावार उर्फ गंगुताई नागोराव जिंदमवार या 50 वर्षीय महिला सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकाने केरळ राज्यातील त्रिवेंद्रम येथे आयोजित मैदानी स्पर्धांमध्ये भाग घेतला. या स्पर्धांमध्ये त्यांनी गोळाफेक स्पर्धेत तृतीय आणि थाळीफेकमध्ये द्वितीय क्रमांक तसेच 100 मिटर धावणे या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. आज पोलीस पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचा सन्मान केला. गंगुताई नारतावार यांनी पोलीस दलात काम सुरु केल्यानंतर आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये विजय संपादन केला आहे.
पोलीस असलेल्या गंगुताईने 50 वर्ष वयात जिंकले मैदानी खेळात तीन पदक