नांदेड(प्रतिनिधी)-अवैध व रसायनमिश्री शिंदी पिल्यामुळेच माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अवैध व रसायनमिश्री शिंदी विकणाऱ्या लोकांविरुध्द माझ्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत या सदरात गुन्हा दाखल कराव असा अर्ज एका आईने दिला आहे.
शामला नरस्या जिंदम रा.गंगाचाळ यांनी पोलीस निरिक्षक वजिराबाद यांना दिलेल्या अर्जानुसार बोरबन परिसरात अवैध व रसायनमिश्रीत शिंदी विक्री होत असते. माझा मुलगा श्रावण नरस्या जिंदम (27) हा ऍटो चालक आहे. तो शिंदी पिऊन नल्लागुट्टाचाळकडे येत असतांना शिंदीचे प्रमाणे त्याच्या शरिरात जास्त झाल्यामुळे तो रस्त्यावरच पडला आणि तेेथेच मरण पावला. त्यानंतर आम्ही त्याला उचलून शासकीय रुग्णालयात नेले पण तो अगोदरच मयत झाल्याचे सांगण्यात आले.
बोरबन परिसरात अवैध व रसायन मिश्रीत शिंदी विक्री करणारे लखन वाघमारे, गणेश मंदा, शांताबाई वाघमारे आणि शिल्पा वाघमारे हे व्यक्ती आहेत. यापुर्वी सुध्दा बऱ्याच जणांना अवैध शिंदी पिल्यामुळे मृत्यू आलेला आहे. दोन महिन्यापुर्वी अजय निर्मले नावाचा तरुण सुध्दा शिंदी पिल्यामुळेच मरण पावला होता. पोलीस निरिक्षक साहेबांनी अवैध व रसायनमिश्रीत शिंदी बंद करावी आणि माझ्या मुलाच्या मृत्यूस कारणीभुत लोकांवर गुन्हादाखल करावा अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे. शामला नरस्या जिंदम यांच्या अर्जाच्या प्रति जिल्हाधिकारी नांदेड, पोलीस अधिक्षक नांदेड यांना दिल्याची नोंद या अर्जावर आहे.