नगरसेविका शबाना बेगम मोहम्मद नासेर यांचे निवेदन

नांदेड(प्रतिनिधी)-शहरात होत असलेल्या अवैध वाळू उत्खननामध्ये परप्रांतीय लोकांचा सहभाग असल्यामुळे शहरात देशी बंदूक सारख्या शस्त्रांचा वापर होत असलेल्याचे निवेदन नांदेड महानगरपालिकेतील नगरसेविका शबाना बेगम मोहम्मद नासेर यांनी पोलीस उपमहानिरिक्षकांना दिले आहे.
शहरातील नदीघाटांवर अवैधरित्या वाळू उत्खनन होत आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष महसुल व पोलीस प्रशासन यांच्या कारवाईमुळे वर्तमानपत्राद्वारे कळले. यात सर्वात महत्वाचा मुद्दा असा की, नदी घाटांवरतील अवैध वाळू उत्खननामध्ये जेंव्हा पासून परप्रांतीयांना हाताशी धरुन अवैध वाळू उत्खनन होत आहे. तेंव्हापासून जास्त प्रमाणात नांदेड शहरात अवैध देशी बंदुकांचा वापर वाढला आहे. शहरात परप्रांतीयांना कोणी आणले. याची चौकशी केल्यास अवैध देशी बंदुकांसारख्या शस्त्रांवर लगाम लागेल.असे ता निवेदनात लिहिले आहे.