नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मांडवी गावात नंदबारमध्ये छापा टाकला. तेथे तेलंगणा राज्यातून नांदेड जिल्ह्यात जुगार खेळण्यासाठी आलेल्या 31 जणांविरुध्द भारतीयजुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेगवेगळ्या टेबलवर वेगवेगळा जुगार सुरू होता. यामध्ये कांही शिक्षक सुध्दा जुगार खेळत होते. या ठिकाणी पकडलेली वाहने आदी मिळून 23 लाख 61 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार उदयसिंग रुपसिंग राठोड, त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार शेख चॉंद, सुरेश घुगे यांनी ईस्लापूर येथील दुलाजी धनलाल पवार आणि धनलाल दुधराम पवार यांच्या नंदबार जागेत झन्न-मन्ना नावाचा जुगार खेळण्याची माहिती प्राप्त झाली. मांडवीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मल्हारी शिवरकर, पोलीस उपनिरिक्षक कऱ्हाळे आणि पठाण, पोलीस अंमलदार मडावी, चुनोडे, मोहुर्ले, कोडमवार, महिला पोलीस अंमलदार जाधव आदींनी पंचासह तेथे छापा टाकला. तेथून पोलीसांनी संपत राजविर रेड्डी रा.तेलंगणा, भास्कर सुदर्शन चिलेरू रा.मंचिरियाल, श्रीनिवास गौड मला गौड, तिरुपती पोचमालू पगडू, रमेश गंगाराम पेदेबोईन्ना, श्रीकांत लक्ष्मय्या, रमेश राजय्या शेरलापेली अशा टेबल क्रमांक 1 वरील लोकांकडून 23 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच टेबल क्रमांक 2 आणि 3 येथून शंकर राजेश्र्वर , टी.संतोष मधूकर, श्रीकांत लक्ष्मय्या, के.उमेश राजारेड्डी, के.शंकर कोसम, तुळशीराम नरसय्या संगा, अप्पाला सतिश साबय्या अशा एकूण 31 लोकांकडून 1 लाख 46 हजार 220 रुपये रोख रक्कम आणि 22 लाख 15 हजार 500 रुपये किंमतीचे इतर साहित्य असा एकूण 23 लाख 61 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या सर्व 31 लोकांविरुध्द मांडवी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार काद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगार सर्वत्र बंद आहे अशा आवय्या उठवल्या जात होत्या. परंतू बाहेर राज्यातून नांदेड जिल्ह्यात हा जुगार सुरू होता त्यावर स्थानिक गुन्हा शाखेने छापा टाकून कार्यवाही केली आहे.
मांडवीमधील गुलामाला स्थानिक गुन्हा शाखेचा चाप; 23 लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त