नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुध्दा आयपीएल सट्टा चालविणाऱ्या दोघांविरुध्द महाराष्ट्र जुगार कायद्याची कार्यवाही करण्यात आली आहे. एकाच दिवशी कुंटूर आणि अर्धापूर अशा दोन पोलीस ठाण्यांनी आयपीएल जुगारावर कार्यवाही केली आहे.
अर्धापूरचे पोलीस उपनिरिक्षक कपिल मुरलीधर आगलावे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 मे रोजी सचिन देशमुख यांच्या आखाड्यासमोरील लिंबाच्या झाडाखाली तामसा रोड अर्धापूर येथे रात्री 10 वाजेच्यासुमारास पोलीसांनी छापा टाकला तेंव्हा तेथे राजस्थान रॉयल्स आणि गुजराथ टायटन्स यांच्यात सुरू असेल्या आयपीएल क्रिकेटमधील सामन्यावर दोन जण बेटींग लावून जुगार खेळत आणि खेळवित होते. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि इतर साहित्य असा 13 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अर्धापूर पोलीसांनी जुगार, क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या दोघांविरुध्द महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12(अ) नुसार उमेश चंद्रकांत डांगे (32) रा.बालाजी मंदिर अर्धापूर आणि अभि गुरखेल (30) रा.अर्धापूर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार नरवाडे अधिक तपास करीत आहेत. अर्धापूर पोलीस ठाण्याने दाखल केलेल्या आयपीएल सट्टा जुगाराची माहिती पोलीस विभागाने 26 मे रोजी पाठवलेल्या प्रेसनोटमधून कळाली.
कुंटूर सोबत अर्धापूर पोलीसांनी सुध्दा आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर टाकली धाड