नांदेड,(प्रतिनिधी)- कंधार तालुक्यातील बाळंतवाडी तांडा येथून १ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या सहा गायी चोरीला गेल्या आहेत.
बाळंतवाडी तांडा ता.कंधार येथील बाबाराव रामराव राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २६ मी रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास त्यांच्या मालकीच्या सहा गायी कोणीतरी अज्ञात चोरटयांनी पळवल्या आहेत.त्या गायीची किंमत १ लाख ९५ हजार रुपये आहे.कंधार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.पोलीस अंमलदार गणाचार्य अधिक तपास करीत आहेत.