नांदेड(प्रतिनिधी)- सध्या शेतीतील पेरणीचा हंगाम सुरू होण्याच्या जवळच आहे. यामध्ये बोगस बियाणे बनवून शेतकऱ्यांची फसवणूक करून मालामाल होण्याचे अनेक कारभार चालतात अशाच एका कारभाराला नांदेडच्या कृषी विभागाने जोरदार चपराक देत येथून बोगस बियाण्यांचे असंख्य नमुने जप्त केले आहेत.
नांदेड कृषी विभागाला नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील एका गोदामात बुलेट ऍग्री प्रोड्क्टस् आणि मयुरी सिड्स या कंपन्या बोगस बियाणे तयार करत असल्याची माहिती मिळाली. यावरून कृषी विभागाने तेथे छापा टाकला असतांना या गोदामामध्ये सोयाबीन, हरभरा, मुग, उडीद आदींची बोगस बियाणे पॅकींग सुरू होती. कृषी विभागाने या गोदामातील सर्वच बियाणे जप्त केले आहेत. पुढील कायदेशीर कार्यवाही वृत्तलिहिपर्यंत सुरू होती.
कृषी विभागाने बोगस बियाणे साठा पकडला