नांदेड,(प्रतिनिधी)- तामसापासून 10 किलो मिटर अंतरावर असलेल्या वानवाडी शिवारात एका 27 वर्षीय महिलेला अगोदर बेशुध्द करुन तीला जिवंत जाळणार् यास तामसा पोलीसांनी काही तासातच गजाआड केले आहे.
दि.27 मे रोजी वानवाडी गावातील लक्ष्मीबाई दत्ता खूपसे (27) या महिला आपल्या शेळ्या घेवून शेतात गेल्या. रात्र झाली तरी परत आल्या नाहीत तेव्हा लक्ष्मीबाईचे पती दत्ता खूपसे आणि मुलगा लोभाजी आणि इतर मंडळी त्यांचा शोध घेत वानवाडी शिवारात बरेच जागी फिरले. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्याच शेतातून जळाल्याचा उग्र वास त्यांनी अनुभवला.तेथे पाहीले असता लाकडाच्या गठ्यावर प्रेत जळालेले दिसले. लोभाजी खूपसेने आपल्या आईच्या बांगड्यांवरुन ओळख पटवली.
तामसाचे सहायक पोलीस निरिक्षक अशोक उजगरे,उप निरिक्षक बालाजी किरवले आणि अनेक पोलीस अंमलदार घटनास्थळी आले.अत्यंत कमी वेळेत पोलीसांनी लक्ष्मीबाईच्या शेजारी शेत असलेल्या हणमंत दिगंबर खूपसे (27) यानेच लक्ष्मीबाईचा खून केल्याचे शोधले. प्राप्त माहितीनूसार जून्या जागेचा वाद लक्ष्मीबाई एकटी असल्याचे पाहून उकरुन काढला. वादात लक्ष्मीबाई च्या डोक्यात लाकडाने वार करुन अगोदर तीला बेशुध्द केले आणि नंतर लाकडांवर ठेवून जाळून टाकले.
पोलीस उप महानिरिक्षक निसार तांबोळी,पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी तामसा पोलीसांना शाब्बासकी दिली आहे.