18 लाख मालमत्ता थकबा;लाठकरांची मालमतौता जप्त

नांदेड,(प्रतिनिधी)- आज दि.३१ मे २०२२ रोजी मनपा आयुक्त डॉ सुनिल लहाने , अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त तथा मुल्य निर्धारक व कर संकलन निलेश सुंकेवार यांच्या आदेशानुसार ५० हजारांवर मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या धारकांकडुन मालमत्ता कर वसुली चे आदेश दिले आहेत.त्यानुसार श्रेत्रीय कार्यालय क्र .४ वजीराबादचे श्रेत्रीय अधिकारी राजेश चव्हाण यांच्या अधिनस्त पथकाने मालमत्ता क्र.३-३-२९ चे मालमत्ता धारक त्रींबकराव माणीकराव लाठकर यांच्या कडे १८ लक्ष ०४ हजार ५६२ रू.मालमत्ता कराची रक्कम थकीत असल्याने लाठकरांची मालमत्ता जप्त करण्यात आली.

या कार्यवाहीत गौतम कवडे , रमेश वाघमारे, अझहर अली, किरणसिंघ, गणेश बुंदेले,सुखमणी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.तसेच मालमत्ता क्र.४०४०३०३२५५ या मालमत्ता धारकाकडुन रू.६६२१५/चा धनादेश घेण्यात आला.मालमत्ता धारकांनी आपला थकीत मालमत्ता कर भरावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *