कर्तव्यदक्ष व निर्भिड व्यक्तीमत्व : उत्तमराव वरपडे पाटील

उत्तमराव शंकरराव वरपडे पाटील हे पोलीस खात्यातुन पोलिस कॉन्सटेबल ते पोलिस उपनिरीक्षक या पदापर्यंत यशस्वीरित्या पोहचलेले एक कर्तव्यदक्ष,निर्भिड, कुशल संघटक, सेवावृत्ती, उत्कृष्ट शरीरयष्टी, साहसी, धाडसी म्हणून सुपरिचित असलेले आणि सर्वांना आपलेसे वाटणारे आकर्षक व्यक्तिमत्व साहेबांनी 34 वर्षे प्रदीर्घ सेवा नंदाने बजावुन नुकतेच 31 मे रोजी नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या सेवापूर्ती निमित्त कार्यक्रम तसेच चिमुकल्या राजे युवराज या गोड नातवाचा प्रथम वाढदिवसानिमित्त सोहळा 3 जून 2022 रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने प्रस्तुत लेख

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना आपले आ दैवत मानून बरपडे पाटील यांनी आपल्या जीवनप्रवासाला सुरुवात केली. तसेच आझाद हिंद सेनेचे संस्थापक, भारतीय स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आपले प्रेरणास्थान मानले बाडे पाटील यांनी त्यांच्या स्नुषा सौ. सोनाल यांच्या आम्हास्तव असतन (नांदेड) येथील शंकरनगरी येथे आपल्या निवासस्थानी छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारून महाराजांप्रति भक्ती, निष्ठा, अभिमान, भूषण व्यक्त करत समाजाला एक कृतोशील प्रेरणा व ऊर्जा दिली.

मन्याड रनोऱ्याच्या कंधार तालुक्यातील बाचोटी या छोटयाशा गावी उत्तमराव यांचा जन्म शंकर पार्वती या दाम्पत्यापोटी 15 मे 1964 रोजी शेतकरी कुटुंबात झाला आईचे नाव पावतीबाई तर वडीलांचे नाव शंकरराव वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षो उत्तमराव पांच मातृछाया हरपली अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी बाचोटी येथे प्राथमिक शिक्षण तर इंदिरा गांधी हायस्कूल, हाडको नांदेड येथे माध्यामिक शिक्षण पूर्ण केले. “संघर्षातून राजमार्ग

आपत्ती ही एक सुवर्णसंधी आहे. आपत्तीमध्ये मनुष्य स्वतःला ओळखतो आपत्तीपेक्षा मोठा गुरु नाही. आपत्तीपासून नवीन धडा मिळतो.

महाभारतातील वरील वचनानुसार उत्तमराव यांनी आपतीलाच सिद्ध मंत्र मानून आपल्या घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात केली. त्यातच बालपाणी मातृछाया हरपली. खेळण्याच्या बागडयाच्या वयात म्हणजेच बालपणात वडीलांच्या छायेत व सावत्र आईच्या आज्ञेत राहून परिस्थितीनुरुप मेहनत व काष्ट करीत राहिले. साधारणतः 10 ते 15 लीटर दूध डोक्यावर घेऊन 7 से 8 किमी (बायोटी ते कंधार) पायपीट करून दुध विकावे लागत होते. त्याकाळात त्यांना बैलगाड़ी हाकायचे कामही करावे लागले. विशेष म्हणजे हॉटेल मालक दुधाचे पैसे दुपारपर्यंत देत नव्हते त्या फावल्या वेळेत उत्तमराव यांनी पेयर वाचन करीत असे. त्यातून त्यांना वाचनाचा छंद जडला, तसेच त्यांना खेळाची व व्यायामाची अत्यंत सच्ची आहे. एक दिवशी रद्दी पेपर वाचत असताना पोलिस भरतीची जाहिरात पाहण्यात आली. मग त्यांनी जाहिरातीप्रमाणे संबंधित कार्यालपाकडे अर्ज केले. मुलाखत घेण्यात आली. त्या पहिल्याच मुलाखतीत त्यांची पोलिस कॉन्सटेबल म्हणून निवड झाली उल्लेखनीय कार्य

सद्रक्षणाय खलनिग्रहणाव हे महाराष्ट्र पोलिस खात्याचे चोदवाक्य आपल्या डोळ्यासमोर ठेवून क्तमराव यांनी आपले कर्तव्द व जबाबदान्या सक्षम व समर्थपणे पूर्ण केल्या सेवेच्या काळात जवळपास तीन हजार क्रिमीनल आरोपींना जेरबंद करण्यात आले. 6 डिसेंबर 1992 साली बाबरी मस्जिद पाडलो त्यावेळी देगलूर येथील दंगल प्रसंगी पाच वेळा फायरिंग केली, तसेच चिखली ता.किनवट येथे डीवाय. एस. पी. वर हल्ला झाला तेव्हा वरपडे पाटील यांनी हल्ल्याला प्रतीउत्तर म्हणून धाडसाने चंदुकांच्या पाच फेरी झाडल्या. तसेच जवाहरनगर-तुप्पा येथे हल्लेखोरांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला चढविला होता. त्यावेळेस प्रसंगावधान बंदुक्कीथी एक फैरी झाली, हे सर्व करत असताना त्यांनी हल्लेखोरांसोबत कधीही तडजोड केली नाही.

जुन्या आठवणी…

मी व्यवसायाने पोलिस आहे. माझ्यावरही समाजाचे ऋण आहेत, सामाजिक बांधिलकी म्हणून प्रसंगानुसार गोरगरीबांच्या अडीअडचणी समयी, लग्नकार्य व धार्मिक कार्यात यथाशक्ती आर्थिक मदत करत आलो यापुढेही करत राहीन. विशेषतः कोरोनाच्या काळात गरजू व गोरगरीबांना अन्नधान्याच्या स्वरुपात मदत केल्याचे समाधान आहे. कोरोना काळात समाजातील इतर घटकांप्रमाणे आमचे पोलिस मित्र व प्रशासन जीव मुठीत ठेवून कुटुंबाची पर्वा न करता कोरोना योध्दा म्हणून जी कामगिरी केली. याचा मला सार्थ अभिमान आहे. मान सन्मान गौरव

कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस

प्रस्तुत वचन आपल्या कार्यातून दाखविण्याचा प्रयत्न वरपडे पाटील यांनी केले आहे. प्रदीर्घ सेवेच्या काळात उत्तमराव यांना खात्याकडून व सामाजिक संस्थेकडुन अनेक मान सन्मान व गौरव झाला पोलिस कॉन्स्टेबल नंतर 2004 मध्ये पोलिस नाईक या पदावर पदोन्नती झाली. 2007 मध्ये हेड कॉन्सटेबल म्हणून तर 2019 मध्ये ए एस. आय. च्या पदावर बढती मिळाली तसेच मे 2021 मध्ये पोलिस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती झाली, अशा पदोन्नतीमुळे जबाबदाच्या व कर्तव्यात वाढ होत गेली. त्या जबाबदान्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या त्यांच्या उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल पोलिस खात्याकडून तब्बल 250 रिवार्ड त्यांना मिळाले. पोलिस खात्याकडुन व सामाजिक संस्थेकडुन त्यांचा मान सन्मान गौरव करण्यात आला. या सर्व यशस्वी वाटचालीत त्याचा धर्मपत्नी सौ. मंगलताई यांचा मोलाचा वाटा आहे.

आपल्या जीवनातील एखादी सुखद घटना व कठीण प्रसंग कोणता ? असे विचारले असता मुलाखत समयो ते असे म्हणाले, माझे लाडके सुपुत्र चि. साईप्रसाद यास पुत्ररत्न झाला तो जगातील सुंदर बाळ राजे युवराज या गोड नातवाच्या मुखदर्शनाने माझे अंतःकरण भरभरुन आले. हा माझ्या जीवनातील सुखद प्रसंग आहे. या सोनेरी काळात मला पी.एस.आप म्हणून पदोन्नतीही मिळाली. हा खरोखरच माझ्या व माझ्या कुटुंबासाठी सुवर्णमय क्षण होता. माझ्या जीवनातील कठीण प्रसंग म्हणजे सेवेच्या 34 वर्षांच्या काळात 28 वेळा बदल्या होत गेल्या प्रामाणिक कर्तव्यदक्षतेने कार्य करीत असतानाही घरिष्ठांकडून गैरसमजूतीतून काही वेळा अन्याय होत गेला. अशा परिस्थितीलाही तोंड देत, न जुमानता लढवय्यावृत्तीने लढा दिला.

मुलाखतांच्या शेवटी वरपडे पाटील यांनी पोलिस बांधवांना संदेश देताना असे म्हणाले, पोलिस कर्मचान्यांनी आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य देऊन कायद्याच्या चौकटी राहुन सत्याने न्यायाने व प्रामाणिकपणे सेवा द्यावी. तसेच समाजात गुन्हेगारी वृत्ती वाढू नये, यासाठी शासन, प्रशासन व समाजाने दक्ष राहिले पाहिजे, सेवानिवृत्तीनंतर प्रगत शेतीकडे विशेष लक्ष देत समाजसेवा करण्याचा माझा मानस आहे. समाजाला अभय देणे, हे माझे प्रथम कर्तव्य राहील. सेवानिवृत्तीनिमित्त उत्तमराव वरपडे पाटील यांना मनःपूर्वक शुभेच्छा तसेच त्यांना दीर्घ आयुरारोग्य लाभो, हिच सदिच्छा…!

-राजेश मठमवार

मुख्याध्यापक, नराशाम प्रा. शाळा सिध्दत्तोर्थधाम, हाळदा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *