नांदेड(प्रतिनिधी)-राज्याच्या महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाच्यावतीने राबवल्या जाणाऱ्या ऑपरेशन मुस्कान-11 ही मोहिम आता नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येणार असून मागील पाच वर्षापासून हरवलेल्या बालकांना शोधण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
नांदेड जिल्हा पोलीस दलातील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.1 जून 2022 ते 30 जून 2022 या कालावधी दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात ऑपरेशन मुस्कान-11 ही मोहिम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत मागील पाच वर्षात हरवलेल्या बालकांचा शोध घेतला जाणार आहे. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे आणि अनैतिक मानवी वाहतुक कक्षाच्या पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक प्रियंका आघाव, अच्युत मोरे, मारोती माने, शितल सोळंके हे पोलीस अधिकारी ही मोहिम राबविण्यासाठी काम करणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत एक अधिकारी आणि चार पोलीस अंमलदारांचे एक स्वतंत्र पथक तयार करून ऑपरेशन मुस्कान-11 ही मोहिम कार्यान्वीत केली जाणार आहे.
जून महिन्यात पोलीस दल राबवणार ऑपरेश मुस्कान