दिपक विरकर यांचे निधन

अर्धापूर(प्रतिनिधी)-शहरातील गवळी गल्ली येथील दिपक फलाजी विरकर वय 40 वर्षे यांचे दि.1 जुन बुधवार रोजी रात्री अपघातात दुर्दैवी निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आज दि.2 जुन गुरुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता अर्धापूर येथे होणार आहे. अर्धापूर शहरामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून वृत्तपत्र विक्रेता म्हणून अनेक दैनिकांचे अविरतपणे वितरण करणारे व अर्धापुर शा. गोदावरी अर्बन बॅंकेचे बचत ठेव प्रतिनिधी अत्यंत कष्टाळू व मेहनती वृत्ती असलेले दीपक विरकर यांचे अपघातात निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी, दोन मुले,दोन भाऊ असा परिवार आहे. ते वृत्तपत्र विक्रेते रमेश विरकर व पत्रकार गुणवंत विरकर यांचे चुलत बंधू होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *