नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस प्रमुख प्रमोद शेवाळे यांच्या उपस्थितीत अनेक पोलीसांनी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांना त्यांच्या जन्मोत्सव दिनी अभिवादन केले.
शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार 2 जून ही तारीख वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती. आज पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप, पोलीस निरिक्षक लक्ष्मण राख, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे, मंगला शिंदे यांच्यासह सर्वच शाखांचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस निरिक्षक उत्तम वाघमारे, पोलीस अंमलदार संजय सांगवीकर, विनोद भंडारे यांनी उत्तमरित्या केले.
पोलीस अधिक्षक कार्यालयात वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी