दोन दरोडे, तीन चोऱ्या; 1 लाख 97 हजार 500 चा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-1 जूनच्या रात्री भोकर फाटा ते बारड जाणाऱ्या रस्त्यावर एका माणसाला मारहाण करून त्याच्याकडून 44 हजार 800 रुपयांचा ऐवज लुटण्यात आला आहे. पुयणी शिवारात चार जणांनी खंजीरच्या धाकावर 2500 रुपये किंमतीच्या ऐवजाची लुट केली आहे. बिलोली येथील तुकाराम नगरात एक घरफोडून चोरट्यांनी 10 हजार रुपये चोरून नेले आहेत. तसेच मुदखेड शहरातून एक घरफोडून चोरट्यांनी 74 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या सर्व पाच चोरी प्रकरणांमध्ये एकूण 1 लाख 97 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
श्रीकांत अच्युत गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 जूनच्या रात्री 10.30 वाजेच्यासुमारास ते दुचाकी क्रमांक एम.एच.44 व्ही.9076 भोकर फाटा ते बारड रस्त्यावरील पेट्रोलपंपासमोर उभी करून नैसर्गिक विधीसाठी गेले असता त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या अज्ञात आरोपींनी त्यांना ढकलून खाली पाडले. चाकूने डाव्या तळहातावर मारून जखमी केले आणि पॉकीटमधील रोख 800 रुपये, आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, 4 हजार रुपये किंमतीचा मोबाईल व 40 हजार रुपयांची स्कुटी असा एकूण 44 हजार 800 रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. अर्धापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक कपील आगलावे अधिक तपास करीत आहेत.
शुभम सुभाष लोणे यांना 1 जून रोजी रात्री 11.30 वाजेच्यासुमारास पुयणी शिवारातील शिवनेरी धाब्याजवळ, नांदेड-निळा रस्त्यावर चार जणांनी खंजीरचा धाक दाखवून त्यांच्याकडील 1000 रुपये रोख रक्कम व 1500 रुपयांचा मोबाईल असा 2500 रुपयांचा मुद्देमाल लुटला आहे. लिंबगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात माधव अप्पाराव मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 जूनच्या सायंकाळी 6 ते 6.30 वाजेदरम्यान दोन महिला आणि एक पुरूष अशा तीन जणांनी त्यांची दुचाकी व इतर साहित्य असा 65 हजार 900 रुपयांचा ऐवज लुटला होता. याबाबतचा गुन्हा शिवाजीनगर पोलीसांनी दाखल केला असून पोलसी उपनिरिक्षक रोडे अधिक तपास करीत आहेत.
संतोष सुभानराव अंकुशकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 जूनच्या सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत त्यांचे घरबंद असतांना कोणी तरी त्यांच्या घराचे कुलूप रॉडने वाकवून आत प्रवेश मिळवला आणि लाकडी अलमारीतील दहा हजार रुपये चोरून नेले आहेत. बिलोली पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार मुद्देमवार अधिक तपास करीत आहेत.
बनवारी जगदीश ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 जूनच्या रात्री 2 ते 2.30 वाजेदरम्यान मुदखेड नांदेड रस्त्यावरील आशा हॉटेलच्या पाठीमागे त्यांच्या घरात जावून कोणी तरी लोखंडी कपाटाचा कडीकोंडा तोडला आणि त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा 74 हजार 300 रुपयंाचा ऐवज चोरून नेला आहे. मुदखेड पेालीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार बी.डी.ठाकूर अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *