नांदेड(प्रतिनिधी)-महावितरणचे नाव सांगून एका सेवानिवृत्त अभियंत्याला ठकसेनांनी 6 लाख रुपयांना गंडवले आहे. विशेष म्हणजे ठकसेनच मुर्ख होते अभियंत्याच्या खात्यात एकूण 19 लाख रुपये रक्कम होती.
सेवानिवृत्त अभियंता गौतम मारोती भावे यांना 27 मे रोजी कॉल आला. कॉलवर बोलणारा व्यक्ती म्हणाला तुमचे महाविरणचे 450 रुपये बिल बाकी आहे. भावे यांनी लगेच होकार दिला. योनो ऍपवर भावे यांना 100 रुपये भरण्याची सुचना करण्यात आली. त्यानुसार त्यांनी ते पैसे भरले. त्यानंतर त्यांना एक लिंक देण्यात आली आणि ती लिंक उघडण्यास सांगितले. सोबतच तुमचा मोबाईल चालू ठेवा आम्ही तुमचे काम पुर्ण करून देतो असे सांगितले. या सर्व वेळेत ठकसेनांनी त्यांच्या मोबाईलचा डाटा एक्सेस केला आणि त्यांच्या बॅंक खात्यातून 6 लाख रुपये वळती करून घेतले. ही सर्व ठकबाजी मोबाईल क्रमंाक 9062388932 आणि दुसऱ्या एका मोबाईलवरून झाली. याबाबतची तक्रार 2 जून रोजी सेवानिवृत्त अभियंता गौतम मारोती भावे यांनी दिली. भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 193/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 420 नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक भारती वाठोरे करीत आहेत. या प्रकरणातील ठकसेनच मुर्ख होते असे दिसते. सेवानिवृत्त अभियंता भावे यांच्या बॅंक खात्यामध्ये एकूण 19 लाख रुपये शिल्लक होते. पण ठकबाजी 6 लाखांचीच झाली.
भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांनी या संदर्भाने जनतेला आवाहन केले आहे की, मोबाईलवर आलेल्या कॉलच्या अनोळखी माणसाच्या बोलण्यावर, कोण्या कंपनीचे नाव सांगून बोलत असेल तर त्यावर विश्र्वास ठेवू नका असा कोणताही कॉल आला तर त्याला प्रतिसाद देतांना दक्ष राहा. पोलीस सर्वसामान्य नागरीकांच्या जीवीत आणि संपत्तीचे रक्षण करण्यासाठी कटीबध्द आहेत पण आपल्या हातून चुक घडणार नाही याची दक्षता बाळगा.
महावितरणचे नाव सांगून फोन कॉलवर 6 लाख रुपयांची गंडवणूक