नांदेड(प्रतिनिधी)-दिनांक ०१/०६/२०२२ रोजी स्वा.रा.वि.म. विद्यापीठ येथे पार पडलेल्या २४ व्या दिक्षांत समारंभात यास्मिन असगरसाब शेख यांना विद्यापीठाची प्राणी शास्त्र या विषयात मा. कुलगुरू डॉ. उध्दव भोसले यांच्या हस्ते पि. एचडी पदवी प्रदान करण्यात आली.
२४ च्या दिक्षांत समारंभाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा कूलपती श्री भगतसिंग कोशारी, सन्मानीय अतिथी मा.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य श्री उदय सामंत व तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शेखर मांडे (मा. सचिव वैज्ञानिक आणि औद्योगीक संशोधन विभाग, दिल्ली), विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले, डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन (मा.प्र. कुलगूरू स्वा.रा.ति.म.. विद्यापीठ, नांदेड) यांच्याकडून दीक्षांत समारंभात पदवी प्रदान करण्यात आली. तसेच त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
“Periphyton system of some selected substrates and their application for culture of Indian Major Carp?’ या विषयावर त्यांनी शोध प्रबंध सादर केला आहे. त्यांना स्कूल ऑफ लाईफ सायन्स येथील विभाग प्रमुख डॉ. शिवाजी पि. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. यास्मिन शेख हया स्वा.रा.ति.म. विद्यापीठ येथे प्राध्यापिका (तासीका तत्वावर ) म्हणून नियुक्त आहेत. यास्मिन यांचे पदवी (बी.एस्सी.) शिक्षण अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयातून पुर्ण झाले आहे. पदवोत्तर (एम.एस.सी.) शिक्षण स्वा.रा.ति.म. विद्यापीठ येथून उच्च गुणासह पुर्ण केले आहे. त्यांना विद्यापीठाचा सुवर्ण पदक प्राप्त आहे.
यावेळी यास्मीन शेख यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले, डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन (मा.प्र. कुलगुरू स्वा.रा.ति.म. विद्यापीठ, नांदेड) व तसेच मार्गदर्शक एस.पी. चव्हाण (विभाग प्रमुख लाईफ सायन्स), डॉ. ग्याननाथ सर, प्रा. कदम सर, प्रा. भोसले मॅडम, प्रा.कांबळे सर, प्रा. आर. मुलानी (विभाग प्रमुख डिस्टन्स ऐजुकेशन ), महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्रा. कदम सर, प्रा. देसाई सर, सौ.प्रा. शिंदे मॅडम यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले त्यांच बरोबर पठाण सर, ख्याजा सर, डॉ. सय्यद इलीयास (पुणा कॉलजे पुणे), डॉ. पाटील सर (सान्यस कॉलजे नांदेड) प्रा. सौ. शिंदे मॅडम (महात्मा फुले), प्रा. पठाण सर ( पठाण कोचिंग क्लासेस अहमदपुर ), रफिक मुंजावार सर ( महात्मा फुले विद्यालय) पोलिस उपनिरीक्षक शेख असद तसेच पालक आणि मित्र वर्ग यांचा वेळोवेळी लाभलेल्या सहकार्यासाठी आभार मानले.